५ सप्टेंबर – शिक्षक दिन. शिक्षक दिन म्हटले की शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, शुभेच्छा देणे आणि विविध उपक्रम आयोजित करणे हे नेहमीचेच. मात्र यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षकाची भूमिका प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी देण्यात आली. काही विद्यार्थ्यांनी ‘विद्यार्थी शिक्षक’ म्हणून वर्गात उभे राहून आपल्या मित्र-मैत्रिणींना शिकवण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी आधी तयारी केली. विषय समजून घेतला, तो इतरांना कसा समजावून सांगायचा याचा विचार केला आणि ज्ञानासोबत संस्कार व विविध मूल्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला, त्यांचा छोटेखानी सत्कार करून त्यांना पेन देण्यात आले. हा पेन केवळ सत्काराचे प्रतीक नव्हता, तर त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक आणि भविष्यात अशाच विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी मिळालेली प्रेरणा होती. पण खरी शिकवण वर्ग संपल्यानंतर मिळाली… कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन शिक्षक दिनाचे महत्त्व, शिक्षकांचे अनुभव आणि विद्यार्थी शिक्षकांनी घेतलेले अनुभव यावर संवाद साधण्यात आला. विद्यार्थी शिक्षकांनी आपले अनुभव सांगताना काही अत्यंत म...
7info Times
विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सर्वांसाठी उपयुक्त माहितीचे विश्वासू व्यासपीठ! शिक्षण, Career Guidance, आरोग्य, प्रवास-पर्यटन तसेच अकोले, संगमनेर व परिसरातील उपयुक्त माहिती एका ठिकाणी. ज्ञान • मार्गदर्शन • अनुभव • माहिती