Skip to main content

Posts

Showing posts from August, 2020

या वर्षी NEET 2020 झालेले बदल.

या वर्षी  NEET  झालेले बदल. या वर्षी  NEET  विद्यार्थ्यांनी  NTA NEET  अधिकृत संकेतस्थळावरून  NEET Admit Card Download  करून प्रिंट घेतली असेल. त्यावर दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे सर्व परीक्षार्थींना पालन करावे. आपल्या  NEET  Admit Card  मध्ये जो वेळ आपल्याला दिला आहे त्यावेळामध्ये आपण आपल्या  NEET Exam Centres  परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. परीक्षा केंद्रावर पोहचल्यानंतर त्याठिकाणी एक नोंदणी खोली असणार आहे. त्याठिकाणी परिक्षार्थींचे तापमान तपासले जाणार आहे ,  जर परीक्षार्थींचे तापमान  37.4  ℃  /99.4 F  कमी असेल त्या परीक्षार्थींना पुढे तपासणी करिता पाठवले जाणार. धातू-शोधक यंत्रामार्फत सामाजिक अंतराचे नियम राखून तपासणी केली जाणार. यदाकदाचित काही विद्यार्थ्यांचे तापमान तपासताना  37.4  ℃  / 99.4F  पेक्षा जास्त असेल अश्या विद्यार्थ्यांना एका खोलीमध्ये सामाजिक अंतराचे नियम राखून  15-20  मिनिट बसवले जाईल त्यादरम्यान तापमान कमी झाले तर पुढे तपासणी कडे पाठवले जा...

NEET 2020 परीक्षा हॉलमध्ये जाताना.

NEET 2020 13 सप्टेंबर 2020 रोजी होत आहे. त्याचे प्रवेश पत्र NTA NEET 2020 अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. NEET 2020 Admit Card काळजीपूर्वक Download करून दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा. परीक्षा देत असताना सोबत काय बाळगू शकता त्याच सोबत सोबत काय बाळगू नये या संदर्भात सर्व सूचना दिल्या आहे त्याचे तंतोतंत पालन करा. NEET 2020 परीक्षा देताना सोबत मास्क , हॅन्डग्लोज , सॅनिटायझर 50 मिली पर्यंत सोबत बाळगू शकता. त्याच सोबत गरज असेल तर पारदर्शक पिण्याचे पाणी बाटली सोबत बाळगू शकता. NEET 2020 Admit Card सोबत आयकार्ड गरजेचे आहे. आयकार्ड कोणते त्याविषयी सविस्तर माहिती NEET 2020 Admit Card मध्ये दिलेली आहे. कोव्हिड 19 च्या परिस्थितीमुळे सामाजिक अंतर राखणे अत्यंत गरजेचे आहे त्याचे प्रत्येक विद्यार्थ्याने काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रावर नोंदणी केली जाणार आहे , त्याच सोबत शरीराचे तापमान देखील घेतले जाणार आहे. परीक्षा हॉल विद्यार्थ्यांनी प्रवेश करण्यापूर्वी आणि परीक्षा हॉल सोडल्यानंतर सॅनिटाइझ केला जाणार आहे. परीक्षा हॉलमध्ये जाताना सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टी...

NEET 2020, JEE Main 2020 परीक्षा रद्द होण्यासंदर्भातील सत्यता.

NEET 2020, JEE Main 2020 परीक्षेची तारीख जवळ येत आहे आणि त्याच सोबत वेगवेगळ्या माध्यमांमध्ये परीक्षा संदर्भात वेगवेगळ्या चर्चा होत आहे त्याची सत्यात पडताळण्याचा केलेला छोटासा प्रयत्न. SOCIAL MEADIA तील विविध माध्यमांमध्ये काही ठिकाणी neet ug 2020, jee main 2020 online exam विषयी वेगवेगळी माहिती सांगितली जात आहे. त्यामध्ये संपूर्ण भारताचा विचार केला तर काही राज्यातील , काही जिल्हा , तालुका , गाव या विविध ठिकाणी पाऊसामुळे पुर परिस्थिती निर्माण झाली याची माहिती HRD Minister Office Delhi यांना देण्यात आली. त्याच सोबत काही राज्यांमध्ये काही ठिकाणी lock down संदर्भातील माहिती देण्यात आली. तसेच काही व्यक्ती आजारी असल्यासंदर्भात माहिती देण्यात आली त्याच सोबत इतर नैसर्गिक आपत्ती कारणांची माहिती email, twitter, phone, प्रत्यक्ष भेटून , निवेदनाद्वारे देण्यात आले. NEET 2020, JEE Main 2020 परीक्षेविषयी कोर्टामध्ये काही दिवसांपूर्वी निर्णय झाला आहे त्यामुळे NEET 2020, JEE MAIN 2020 परीक्षा घेण्यासंदर्भात मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार परीक्षा घेण्यासंदर्भातील यंत्रणा काम करत आहे. तसेच प्रवेश पत्र (...

MHTCET 2020 परीक्षा संभाव्य तारीख, अभ्यासाचे नियोजन.

MHTCET 2020 परीक्षा संभाव्य तारीख , अभ्यासाचे नियोजन. नुकतेच कोर्टाकडून JEE Main 2020 परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर 2020 व NEET UG 2020 परीक्षा 13 सप्टेंबर घेण्यासंदर्भात निर्णय झाला त्यामुळे. आता या परीक्षा जर सुरळीत पार पडल्या तर MHTCET 2020 संदर्भात लवकरच निर्णय येऊ शकतो. काही दिवसांपूर्वी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सांगितले होते की MHTCET Cell चे आयुक्त यांच्यामार्फत जिल्हास्तरावर , तालुका स्तरावर परीक्षा घेण्यासंदर्भात सर्व्हेक्षण सुरू आहे की ज्यामध्ये परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्था , ऑनलाईन परिक्षेकरिता संगणक संख्या , लाईट , जनरेटर , इंटरनेट , सोसिएल डिस्टन्स नियम पाळण्यासंदर्भात भौतिक सुविधा. तो अहवालात प्राप्त होताच उच्च व तंत्र शिक्षकमंत्री यांना पाठवला जाईल त्यानंतर MHTCET 2020 Online Exam निर्णय घेण्यासाठी मदत होईल. MHTCET 2020 Online Exam संभाव्य तारीख 13 सप्टेंबर नंतर असू शकते कारण 1 ते 6 सप्टेंबर JEE Main 2020 होत आहे आणि 13 सप्टेंबर रोजी NEET UG 2020 होत आहे. हे होत असताना शासनाकडून सद्याची परिस्थिती थोडी निवळण्याची वाट जर पाहिली गेली तर ऑक्टोबर मध्ये सं...

दहावी-बारावीनंतर पुढे "वर्तमान-भविष्याचा वेध-निरीक्षण." (Present-Future Jobs Opportunity, Observation.).

  (Career) करीयर निवडताना पुढील महत्वाचा प्रश्न आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये करियर करायचे आहे त्या क्षेत्रामध्ये वर्तमान-भविष्याचा वेध , निरीक्षण केले आहे का ? वरील प्रश्नाचे उत्तर शोधताना खालील काही मुद्यांचा विचार करावा. अनेक वेळेस पाल्य-पालक करियर निवडताना वर्तमानात असलेल्या संधीचा विचार करून करियर निवडता ते काही प्रमाणात योग्य देखील आहे परंतु त्याच सोबत भविष्यात सुद्धा आपल्याला ज्या क्षेत्रात करियर निवडायचे आहे त्यात संधी उपलब्ध राहणार आहे का ? की आपण जे करियर निवडणार आहे त्यापेक्षा जास्त संधी इतर आणखी कोणत्या क्षेत्रातमध्ये उपलब्ध होणार आहे का याचा देखील विचार करावा. सरकारचे विविध उद्योग-धंद्यासंदर्भात धोरणे , त्याची अंमबलबजावणी सुरू आहे की भविष्यात होणार आहे ? विविध कंपन्यामध्ये देशात-विदेशातुन गुंतवणूक , नवीन कंपनी येत आहे की आहे त्या कुठे बाहेर जाणार आहे ? रोजगाराच्या संधी वाढत आहे की कमी होत चालल्या आहे याचा तुलनात्मक अभ्यास करावा. देश-विदेशात ( National International Jobs) संबंध यांचा देखील रोजगार उपलब्धतेवर परिणाम होत असतो त्याचे उदाहरण घायचे ठरले तर सध्या भारत-चीन व्यापा...

दहावी-बारावीनंतर पुढे "अनुभवींचा सल्ला."

करीयर निवडताना पुढील महत्वाचा प्रश्न आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये करियर करायचे आहे त्या क्षेत्रामध्ये करियर करणारे आपल्यापेक्षा वयाने मोठया व्यक्तींचा सल्ला , मार्गदर्शन घेतले आहे का ? पालक-पाल्य यांनी या प्रश्नाचे उत्तर शोधताना पुढील काही मुद्यांवर विचार-मंथन करावे. आपल्या पेक्षा वयाने मोठी व्यक्ती आपल्याला जे करीयर करण्यासाठी क्षेत्र निवडायचे आहे त्यात जर असेल आणि किंवा आपण संपर्क करून त्या व्यक्तींचा सल्ला , मार्गदर्शन जर आपण घेतले तर त्या व्यक्तीं तुम्ही आता ज्या प्रश्नांमध्ये अडकलेले असाल किंवा ज्या स्तरावर असाल तो अडथळा , स्तर त्या व्यक्तींनी या आधी अनुभवलेला असतो आणि त्यामुळे त्यांनी यावर कश्या पध्दतीने मात केली हे आपण त्यांना विचारल्यानंतर निश्चितपणे ते आपला आलेला अनुभव सांगता आणि त्या अनुभवावरून आपल्याला करियर ( Career) संदर्भातील प्रश्न सोडवताना मदत होते. अनुभव फक्त एक व्यक्तीचा न घेता एका पेक्षा जास्त व्यक्तींचा घेतल्यास त्यातून मिळणारी माहितीवरून तुम्हाला काय योग्य अयोग्य हे ठरवण्यासाठी मदत होते. प्रामुख्याने कॉलेज कॅम्पस ( College Campus), कॉलेजमध्ये नोकरी करिता कॅम्पस इंटर...

दहावी-बारावीनंतर पुढे "करियर संधी".

संधी ( Scope): पुढील महत्त्वाचा प्रश्न आपल्याला जे क्षेत्र आवडते त्यामध्ये करियर ( career) करण्याची संधी आहे का ? त्याची व्याप्ती फक्त देशात ( National Level) आहे की संपूर्ण जगात ( world, International Level) आहे ? या प्रश्नावर पालक-पाल्य ( Parents, Ward) यांनी विचार-मंथन करावे. या प्रश्नाचे उत्तर शोधताना विचार-मंथन करताना काही महत्वाच्या मुद्द्यांचा विचार करू शकता. तुम्हाला एखाद्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्यामुळे लगेच क्षेत्र निवडण्याची घाई करू नये. आपल्याला ज्या क्षेत्रातमध्ये करियर करायच आहेे त्यात पुढे देशात-विदेशात , सरकारी-खाजगी ( Government Sector, Private Sector, Government Jobs, Private Company Jobs) क्षेत्रात संधी आहेत का ? याची सविस्तर माहिती घ्यावी. कामाचे स्वरूप कसे आहे ? काम शिफ्ट मध्ये असणार की काही ठराविक वेळात असणार ( Office Time), वर्षभर असणार की फक्त काही ठराविक महिनेच काम असणार ? सुट्ट्या किती असणार ? काम करताना पुढे कोणकोणत्या संधी उपलब्ध होतात ? काही शहरांमध्ये या क्षेत्राची संधी जास्त आहे का ? आपल्याला घराच्या जवळ जॉब करायचा आहे की देशात विदेशात कोठेही नोकरी ( Job...

दहावी-बारावीनंतर पुढे करियर निवडताना कोणकोणत्या मुद्यांवर विचार-मंथन केले पाहिजे? त्यातील आज आवड याविषयी थोडक्यात माहिती घेऊ या.

दहावी-बारावीनंतर पुढे करियर निवडताना कोणकोणत्या मुद्यांवर विचार-मंथन केले पाहिजे ? त्यातील आज आवड याविषयी थोडक्यात माहिती घेऊ या. इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा पास झाल्यानंतर पुढे कोणत्या क्षेत्रामध्ये करियर करायचे ? हा दिव्य प्रश्न विद्यार्थी-पालक यांना पडलेला असतो. हा प्रश्न सोडवताना काही महत्वाच्या मुद्यांवर विद्यार्थी-पालक यांचे विचार-मंथन झाले तर हा प्रश्न सुटण्यासाठी मदत होऊ शकते. त्या संदर्भात काही महत्वाच्या मुद्यांवर आपण थोडक्यात बघूयात. आवड : करिअर निवडताना पहिला प्रश्न , आपल्याला कोणते काम करण्यास आवडते ? कारण भविष्यात आपण सर्व शिक्षण घेणार , खाजगी किंवा सरकारी नोकरी मिळविणार , तेथे आपल्याला पगार चांगला असणार , पण त्यावेळेस काम करताना जर आपल्याला ते काम करण्याची आवड जर नसेल तर पैसे मिळत असताना ते काम करण्याची इच्छा , आवड राहत नाही , इतरांना दोष देणे असे विविध प्रश्न तयार होतात व पुन्हा करियर बदलण्याचे विचार येतात परंतु तेंव्हा वय जास्त झाले असताना पुन्हा नवीन करियर घडविण्याच्या दृष्टीने नवीन शिक्षण घेणे अवघड होते परंतु तरी देखील जिद्द , चिकाटी , ध्येय गाठण्याच...

MHTCET 2020 ऑनलाईन एक्साम सर्व्हेक्षण अहवाल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री को सोपा जायेगा|

MHTCET 2020 एन्ट्रान्स एक्साम को लेकर कुछ खबरे आयी , आयुक्त महाराष्ट्र सीईटी सेल के तरफसे सर्व्हेक्षण चल रहा है , उसमे जो प्रमुख पॉईंट्स है जैसे तहसील , जिल्हा स्तर पर एमएचटी सीइटी ऑनलाईन एक्साम 2020 लिया जा सकता है क्या ? उसके उसके लिये सभी अत्यावश्यक इन्फ्रास्ट्रक्चर की उपलब्धी है क्या , जैसे बैठणेकेलीये चैर , कॉम्प्युटर , लाईट , जनरेटर , इंटरनेट कनेक्टिव्हिटी , पाणी पिणेकी सुविधा और बहुत कुछ. अगर एक्साम हो तो उस जगह पे सोसिल डिस्टन्स का पालन हो सकता है क्या ऐसें बहुत सारे पॉईंट्स को देखकर सर्व्हेक्षण सुरू है | सर्व्हेक्षण जलदी पुरा हो जायेगा और उसको उच्च व तंत्र शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य को सौपा जायेगा उसके बाद एमएचटी सीइटी 2020 का ऑनलाईन एक्साम के संदर्भ मे बैठक होगी उसके उपर चर्चा होगी उसमे सप्टेंबर मे अगर jee main 2020, neet 2020 होता है तो उसके उपर भी उस बैठक मे चर्चा होगी उसके बाद निर्णय लेने मे आसनात होगी | तब तक सभी विद्यार्थीयोने अपना समय बरबाद न करके उसका अच्छेसे नियोजन करे , physics, chemistry, mathematics, biology इन मे से आपके जो विषय होंगे उसका मेहनतसे पढाई करो | ज्...