Skip to main content

Posts

Showing posts from 2023

मला कधी कळलेच नाही..

मला कधी कळलेच नाही... मी ज्यांना आपले मानले, त्यांनीच माझ्या पाठीवर वार केले. काहीतरी चुकीचे घडत आहे, हे जाणवत होते; अनेक गोष्टी समजत होत्या. पण ज्यांना आपले मानले होते, त्यांना दुखवायचे नव्हते. म्हणून मी शांत राहिलो. पाठीत घाव होत राहिले. विश्वासघातालाही लाज वाटावी, अशी काही कृत्ये माझ्यासमोर घडत होती. सगळे समजत असूनही मी गप्प राहिलो. कारण माझ्या मनात कोणाचे वाईट करण्याची इच्छा नव्हती. काही पुरावे मिटवले जात होते, काही गोष्टी जाणीवपूर्वक लपवल्या जात होत्या. पण नशिबाच्या लेखणीने लिहिलेला हिशोब कुणालाही पुसता येत नाही, हेही हळूहळू जाणवत गेले. पडद्यामागे काही जण आपल्या बुद्धीचा, चातुर्याचा आणि ताकदीचा वापर करून मला नामोहरण करण्याचे प्रयत्न करत होते. अंधारातून वार होत होते; प्रत्येक हालचाल जाणवत होती. तरीही मी शांत राहिलो. कारण मला कोणाला दुखवायचे नव्हते. या सगळ्याचा परिणाम मनावर होत होता. रात्र-रात्र झोप लागत नसे. मन अस्वस्थ होत असे. उर भरून येत असे. नको नको ते विचार मनात येत. ज्यांना आपले समजले, त्यांच्याकडूनच असा घात होऊ शकतो, हे स्वीकारणे सोपे नव्हते. अशा वेळी माझ्या लेकराचे...