Skip to main content

Posts

Showing posts from October, 2024

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अंशतः अनुदानित माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांची २०२४-२५ पटपडताळणी शिबीराचे आयोजन.

दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४:  अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अंशतः अनुदानित माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांची २०२४-२५ पटपडताळणी शिबीराचे आयोजन. शासन निर्णय 14.10.2024 आणि शिक्षण उपसंचालक पुणे विभाग यांचे दिनांक 30. 10. 2024 रोजी चे पत्र यानुसार शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी अंशतः अनुदानित माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांची पटपडताळणी शिबिराचे आयोजन केलेले आहे. या संबंधात अहिल्यानगर जिल्ह्यातील माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांचे मुख्याध्यापक प्राचार्य यांना संबंधित परिपत्रक देण्यात आलेले आहे त्यानुसार पटपडताळणी शिबिराचे कामकाज होणार आहे संबंधितांनी सर्व माहिती दिलेल्या सूचनांप्रमाणे वेळेमध्ये सादर करण्यास सांगितले आहे.