आझाद मैदान मुंबईत आंदोलनातील संख्या ठरवणार वेतन अनुदानाचे भवितव्य. शाळांची तपासणी पूर्ण होऊनही वेतन अनुदान वितरण करण्यास विलंब.
राज्यातील अनुदानास पात्र घोषित , अघोषित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी १०० % वेतन अनुदान मिळावे यासाठी एकत्र येत खाजगी प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान , मुंबई येथे बेमुद्दत धरणे आंदोलन २९ जानेवारी २०२१ पासून सुरू केले आहे. या वेतन अनुदान आंदोलनामध्ये प्रामुख्याने शासननिर्णय १३ सप्टेंबर २०१९ मधील घोषित , अनुदान मंजूर २०% व २०% अनुदान प्राप्त शाळा व वर्गतुकड्यांना वाढीव २०% यांचा निधी वितरणाचा शासननिर्णय प्रचलीत नियमाप्रमाणे म्हणजेच (१५ नोव्हेंबर २०११ , ०४ जून २०१४) या धोरणानुसार निर्गमित करणे , तसेच अघोषित शाळा , वर्गतुकड्या , नैसर्गिक तुकड्या निधीसह घोषित करणे , सेवासंरक्षणासह वैद्यकीय प्रतिपूर्ती देणे , १ एप्रिल २०१९ पासून ३१आँक्टोबरपर्यंतचे थकीत वेतन अदा करणे या व इतर मागण्यासाठी सदरील आंदोलन सुरू केले असून उपरोक्त मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन कुठल्याही परिस्थितीत स्थगित करणार नसल्याचे शिक्षक समन्वय संघाच्यावतीने स्पष्ट कर...