आझाद मैदान मुंबईत आंदोलनातील संख्या ठरवणार वेतन अनुदानाचे भवितव्य. शाळांची तपासणी पूर्ण होऊनही वेतन अनुदान वितरण करण्यास विलंब.
राज्यातील अनुदानास पात्र घोषित, अघोषित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी १००% वेतन अनुदान मिळावे यासाठी एकत्र येत
खाजगी प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक
शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान, मुंबई
येथे बेमुद्दत धरणे आंदोलन २९ जानेवारी २०२१ पासून
सुरू केले आहे.
या वेतन अनुदान आंदोलनामध्ये प्रामुख्याने शासननिर्णय १३ सप्टेंबर
२०१९ मधील घोषित, अनुदान
मंजूर २०% व २०% अनुदान प्राप्त शाळा व वर्गतुकड्यांना वाढीव २०% यांचा निधी
वितरणाचा शासननिर्णय प्रचलीत नियमाप्रमाणे म्हणजेच (१५ नोव्हेंबर २०११,०४ जून २०१४) या धोरणानुसार निर्गमित करणे, तसेच
अघोषित शाळा, वर्गतुकड्या, नैसर्गिक
तुकड्या निधीसह घोषित करणे, सेवासंरक्षणासह वैद्यकीय
प्रतिपूर्ती देणे, १ एप्रिल २०१९ पासून
३१आँक्टोबरपर्यंतचे थकीत वेतन अदा करणे या व इतर मागण्यासाठी सदरील आंदोलन सुरू
केले असून उपरोक्त मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन कुठल्याही
परिस्थितीत स्थगित करणार नसल्याचे शिक्षक समन्वय संघाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले
आहेत.
तपासणीचा अहवाल शिक्षणविभागास प्राप्त असूनही शिक्षकांना हेतूपुरस्सर वेतनापासून वंचित ठेवण्याची शासनाची मानसिकता आहे. सदरील प्रयत्न हाणून पाडायचे असल्यास शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने आझाद मैदानयेथे चालू असलेल्या शिक्षकांच्या हक्काच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.आपल्या हक्काचे वेतन मिळवण्याचा प्रयत्न करावा. शासनाकडे सर्व परिस्थिती अनुकूल असूनही आपल्याकडे होणाऱ्या दुर्लक्षाला आपणच जबाबदार राहू नये. त्यामुळे मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आझाद मैदानावर तात्काळ हजार व्हावे.
Comments
Post a Comment