Skip to main content

Posts

Showing posts from January, 2022

विनाअनुदानित तथा अंशतः अनुदानित शिक्षकांना सेवा-संरक्षणसाठी पुणे येथे धरणे आंदोलन.

 विनाअनुदानित तथा अंशतः अनुदानित शिक्षकांना सेवा-संरक्षणसाठी पुणे येथे धरणे आंदोलन. पुणे: दिनांक: ३१ जानेवारी २०२२ महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समिती.       आपणां विनाअनुदानित तथा अंशतः अनुदानित शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांपैकी सर्वांच्या जिव्हाळ्याची व आजच्या घडीला त्यासाठी शासनाला कोणतीही जादाची आर्थिक तरतूद न करावी लागणारी मागणी म्हणजे 'सेवा-संरक्षण' होय.आपल्यात शासनाने हेतुपुरस्सर फूट पाडून इतके प्रश्न निर्माण केले आहेत की जो-तो आपापला प्रश्न सोडवण्यासाठी धडपडत आहे.परंतु दुर्दैवाने सेवा-संरक्षण कडे नाही म्हणायला सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे असे वाटते.      आणि म्हणूनच  महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने सोमवार दिनांक ३१ जानेवारी २०२२ पासून आयुक्त कार्यालय,पुणे येथे या एकमेव मागणीकरीता  'बेमुदत धरणे आंदोलन' सुरू करण्यात येत आहे.      यास्तव राज्यातील तमाम विनाअनुदानित तथा अंशतः अनुदानित शिक्षकांना या पोस्टद्वारे आवाहन करण्यात येते की ज्यांना-ज्यांना शक्य आहे अश्यांनी उद्याप...

दुखवटा आंदोलन: महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आमदार महोदयांच्या घरासमोर त्रुटीपुर्तता याद्या तात्काळ घोषीत करुन आर्थीक तरतुद करावी यासाठी,सर्व संघटनेच्या बांधवांनी आवर्जुन हजर राहावे.....

दुखवटा आंदोलन: महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आमदार महोदयांच्या घरासमोर त्रुटीपुर्तता याद्या तात्काळ घोषीत करुन आर्थीक तरतुद करावी यासाठी,सर्व संघटनेच्या बांधवांनी आवर्जुन हजर राहावे..... दि.२२/१/२०२२              उच्च माध्य./क म वि शिक्षक शिक्षकेत्तर संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित लढा न्याय व हक्कासाठी.           दि १२,१५, व २४फेब्रुवारी ला त्रुटीत आलेल्या बांधवाची एकाच महिण्यात त्रुटीपुर्तता करुन,आर्थीक तरतुद करावी असा,शासण आदेश असतांना विनाकारण आपल्याच सोबत घोषीत असलेले,तथा २०% वेतन घेत असलेल्या बांधवांवर कुठलीच कागदोपत्री चुक नसताना अन्याय केलेला आहे,दोन वेळा मा आमदार महोदयांच्या घरासमोर आंदोलने झाली,आझाद मैदानावर आंदोलन झाले,सभागृहात हा प्रश्न मा सभापती महोदयांनी राखुन ठेवला,शिक्षणखात्यावर नाच्चकी ओढवली तरी मा सभापती महोदयांनी सांगितल्या प्रमाने मा अर्थमंत्री महोदयांसोबतची बैठक होत नाही,व न्याय मिळत नाही,आपले त्रुटीचे बांधव मरत आहेत,त्यांचे ब्रेन हँब्रेज होत आहेत,तरी नुसती टोलवा टोलवी करुन वेळ मारुन नेऊन एक एक अधिवेश...

विना अनुदानित शिक्षक समाजातील भळभळणारी जखम.

 विना अनुदानित शिक्षक समाजातील भळभळणारी जखम.            विना अनुदानित शाळेत काम करणे म्हणजे फुकटच्या भाकरी तोडुन काम करणे होय. विना अनुदानित शिक्षकांना कोणी वालीच राहिले नाही अशी अवस्था महाराष्ट्र सरकारने केली आहे. ४०% अनुदानासाठी १६० च्या वर आंदोलने झाली आहेत. उरलेल्या ६०% साठी २०० आंदोलने करावी लागतील. उपाशीपोटी विद्यार्थांना शिकवणे हा कुठला न्याय आहे तेच कळत नाही. विना अनुदानित वर शिकवुन उतरत्या वयात तुटपुंज्या पगारात दिवस काढण्यासाठी शिक्षक धडपडत आहे. विना अनुदानित शिक्षकांच्या व्यथा ऐकण्यासाठी दगडाचे काळीच पाहिजे. आज अनेक शिक्षकांचे स्वप्न यामुळे अपुर्ण राहिलेली आहेत. आई वडील तर पगारचे स्वप्न पहात पहात २० वर्ष झाली पण पगार काही केल्या चालु होत नाही. आणखी किती वर्ष सरकार घेणार आहे तेच कळत नाही.              वेळेची किंमतच नाही अशी भावना मनात येत आहे. २० वर्षाचा वेळ वाया गेला तरीपण सरकार प्रमुख मागण्यांकडे डोळेझाक करत आहे. वेळेची किंमत सरकारलाच नाही तर सामान्य माणसाला काय असेल. एक एक दिवस वाया जात आहे तसतस...

वेतन निधी लेखाशिर्ष ५११ निधी शासन निर्णय बाबत अपडेट.

अमरावती: दिनांक: १९ जानेवारी २०२२:            लेखशिर्ष ५११ निधी शासन निर्णय बाबत माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांनी लेखाशिर्ष ५११ मधील निधी अजूनही खर्च न केल्यामुळे मंत्रालय स्तरावरून अगोदर तो निधी खर्च करावा अशा सूचना देण्यात आल्या होत्या त्यामुळे आज तो शासन निर्णय  निघू शकला नाही. परंतु अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरणराव सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना अवगत केले की बरेच जिल्ह्यांनी हा निधी खर्च केला असून नोव्हेंबर पासून कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित आहेत. त्यामुळे अशा जिल्ह्यांसाठी निधीची आवश्यकता असल्याने सदर लेखशिर्षका करिता निधी वितरण करावे असे सूचित केले असून लेखाशिर्ष ५११ निधी चा शासन निर्णय येत्या एक ते दोन दिवसांमध्ये निर्गमित करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. -अमरावती विभागीय शिक्षक संघ.

अघोषित शाळांना पुन्हा दिला धोका.

अघोषित शाळांना पुन्हा दिला धोका. पुणे: १९ जानेवारी २०२२           अघोषित बाबत तारखांचा घोळ थांबेना.  पुणे आयुक्तांनी वाढवली ३१ जानेवारी २०२२ पर्यंत ची तारीख. अघोषित महासंघातर्फे काल १८ जानेवारी रोजी पुणे स्तरावर अघोषित याद्या मंत्रालायात कधी पाठवणार याविषयी विचारणा करण्यात आली तर अधिकाऱ्यांनी ३१ जानेवारी २०२२ हि तारीख दिली त्यामुळे काही दिवसांपूर्वी काही शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्यांनी अघोषित घोषित होण्यासाठी अजून 2 वर्ष लागतील हा शब्द खरा होतो कि काय अशी भीती अघोषित शिक्षक वर्गामध्ये होताना पाहायला मिळत आहे.          अघोषित शिक्षकांनी शिक्षक आमदारांना संपर्क केल्यानंतर शिक्षक आमदारांकडून उद्या पुणे स्तरावर संपर्क करण्याचे मिळाले आश्वासन.

२२ जानेवारी २०२२ पासून त्रुटी पूर्तता सुरु होणाऱ्या आंदोलनात सामील होण्याचे के.पी.पाटील सरांकडून आवाहन.

२२ जानेवारी २०२२ पासून त्रुटी पूर्तता सुरु होणाऱ्या आंदोलनात सामील होण्याचे के.पी.पाटील सरांकडून आवाहन. मुंबई: दिनांक: १९ जानेवारी २०२२:             आज मा.सभापती यांनी सांगितल्याप्रमाणे बैठक आयोजित करणे अपेक्षित होते.परंतू शासनाकडून हेतूपुरस्सर वेळकाढूपणा सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.आज दिवसभर मा.मंत्री तथा मंत्रालय स्तरावर त्रुटीपात्र शाळांना पात्र करण्यासाठी कुठल्याही प्रकारची हालचाल होताना दिसत नाही.सद्यस्थितीत सदरील शाळांचे भवितव्य पूर्णतःअंधारात असल्याचे निदर्शनास आले आहे.           अधिवेशनाचा जवळ आलेला कालावधी पाहता फक्त त्रुटीपात्र शाळांसाठी १२ दिवसच बाकी आहेत.त्यामुळे त्रुटीपात्र शाळांतील बांधवांनो जागे व्हा! २२ पासून सुरु होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हा!असे आवाहन सौ.नेहाताई गवळी,पुंडलिक(काका) रहाटे,प्रा.सदानंद बानेरकर आदी पाठपुराव्यासाठी उपस्थित होते.

महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन महा. राज्य व नवयुग शिक्षक क्रांती शिक्षक संघटना म. रा यांच्या वतीने पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयात पाठपुरावा करण्यात आला.

 महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन महा. राज्य व नवयुग शिक्षक क्रांती शिक्षक संघटना म. रा यांच्या वतीने पुणे शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे पाठपुरावा करण्यात आला. अघोषित प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक व सन २०१२/१३ च्या नैसर्गिक तुकड्याच्या  शाळेच्या फाइल तात्काळ मंत्रालय स्तरावर पाठवणे.  त्रुटी पूर्तता पात्र झालेल्या शाळेची यादी तात्काळ घोषित करून २० टक्के अनुदान मंजूर करणे. २० टक्के,  ४० टक्के शाळांना पगारात होणारा विलंब तात्काळ दूर करून थकित वेतन शिक्षकाच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करण्याचा आदेश निर्गमित करावा. वरील मागण्या तात्काळ पुर्ण नाही झाल्या तर, आयुक्त कार्यालय पुणे येथे बेमुदत आंदोलन करण्यात येईल. असे संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांच्या कार्यालयात वरील मुद्द्यावर सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले. त्यावेळी राज्य अध्यक्ष श्री गजानन खैरे सर, मराठवाडा विभागीय अध्यक्ष श्री गोपाल गोरे सर तथा विविध संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक वृंद उपस्थित होते.

शालार्थ,सेवा सातत्य संबधी शिबिर(अहमदनगर जिल्हा) संपन्न: मा.आ.किशोरभाऊ दराडे (शिक्षक आमदार,नाशिक विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अधिकारी यांच्या उपस्थितीत शिबिराचे आयोजन संपन्न.

अहमदनगर: १८ जानेवारी २०२२  उच्च माध्यमिक,कमवी शिक्षक शिक्षकेत्तर संघटना,महाराष्ट्र राज्य. शालार्थ,सेवा सातत्य संबधी शिबिर(अहमदनगर जिल्हा) मा.आ.किशोरभाऊ दराडे (शिक्षक आमदार,नाशिक विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अधिकारी यांच्या उपस्थितीत शिबिराचे आयोजन संपन्न. ठिकाण-- आत्मा मलिक विद्यालाय कोकमठान, कोपरगाव.जि- अहमदनगर. दिनांक-- १८ जानेवारी २०२२, वार- मंगळवार वेळ- दुपारी २ वाजता.           अहमदनगर जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक, कमवी शाळेतील 20% अनुदानित असणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींना सूचित करण्यात येत आहे की,ज्या ज्या बांधवांना शालार्थ,सेवा सातत्य बाबत अडचणी असतील,प्रस्ताव प्रलंबित असतील,प्रशासनिक तक्रारी असतील त्या त्या बांधवानी तात्काळ कोकमठान येथील शिबिरात सहभागी व्हायचे आहे. शालार्थ तसेच सेवा सातत्य बाबतीत वेळोवेळी येणाऱ्या तक्रारी, प्रलंबित असणारे प्रस्ताव, अधिकाऱ्यांच्या तक्रारी याबाबतीत स्पष्ट न्याय मिळावा म्हणून शिक्षक आमदार मा.किशोरभाऊ दराडे यांनी शिबिराचे आयोजन केले आहे. तर जास्तीत जास्त बांधवानी ह्या शिबिराचा लाभ घ्यावा...

आ.विक्रम काळे व आ.सुधीर तांबे यांच्यासोबत म.रा.का.वि.शा.कृती समिती शिक्षकांचा मंत्रालयात सेवासंरक्षण, वेतन निधी करीता पाठपुरावा.

आ.विक्रम काळे व आ.सुधीर तांबे यांच्यासोबत म.रा.का.वि.शा.कृती समिती शिक्षकांचा मंत्रालयात सेवासंरक्षण, वेतन निधी करीता पाठपुरावा. मुंबई: १८ जानेवारी २०२२           3361 हेडच्या पगाराबाबत घेतली भेट शिक्षकांनी शिक्षणमंत्र्यांची भेट समवेत शिक्षकआमदार व पदवीधर आमदार...गुरुवार पर्यंत पगार न झाल्यास अंदोलनाचा दिला ईशारा....           आज कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती मुंबई विभाग शिक्षक व शिक्षकआमदार श्री. विक्रम काळे आणि पदवीधर आमदार श्री.सुधिर तांबे यांच्यासोबत शिक्षणमंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड यांची भेट घेण्यात आली. शिक्षकांकडून वेतन निधी शासन आदेश आजच निघावा अशी मागणी करण्यात आली. त्यावर शिक्षणमंत्री यांनी याबाबतीत लगेच सचिवांना फोनवरून सुचना केल्या व  आंदोलन करण्याची आवश्यकता नाही असे सांगितले. तसेच सेवासंरक्षण हा विषय का लालफितीत आडकलाय याबाबतीत विचारणा करण्यात आली असता, फाईल तयार आहे. लवकरच सेवासंरक्षण शासन निर्णय घेऊ असे त्यांनी यावेळी सांगितले .सेवा सरंक्षणाचा निर्णय तात्काळ न झाल्यास दिनांक २५ जानेवारी २०२२ पासून राज...

..तर पुन्हा सुनावनीस उपस्थित असलेल्या मा.शिक्षक व मा.पदवीधर आमदार यांच्या निवासस्थानासमोर अथवा कार्यालयासमोर त्रुटीपात्र बांधव बेमूदत "दुखवटा"

..तर पुन्हा सुनावनीस उपस्थित असलेल्या मा.शिक्षक व मा.पदवीधर आमदार यांच्या निवासस्थानासमोर अथवा कार्यालयासमोर त्रुटीपात्र बांधव बेमूदत "दुखवटा" औरंगाबाद दि.१७ जानेवारी           दुसरा आठवडा संपला,तिस-या आठवडा सुरू तरी बैठक नाही.२१ तारखेपर्यंत त्रुटीपात्र शाळांबाबत निर्णय न झाल्यास दि २२ जानेवारी २०२२ पासून बेमूदत "दुखवटा" पाळणार.           त्रुटीपात्र शाळांबाबत मा.सभापती यांनी या शाळांबाबत अधिवेशन संपल्यावर मा.मुख्यमंत्री व मा.अर्थमंत्री यांच्यासमवेत दुसऱ्या अथवा तिसऱ्या आठवड्यात बैठक घेऊन निर्णय घ्या,असे आदेशित केले होते.               विधानपरिषदेचे मा.सभापती महोदय यांनी हिवाळी अधिवेशनात(२८डिसेंबर२०२१)दिलेल्या निर्देशानुसार त्रुटीपात्र शाळांची यादी घोषित (शासननिर्णयाने) करण्यासाठी अधिवेशन संपल्यावर दुसऱ्या अथवा तिसऱ्या आठवड्यात मा.मुख्यमंत्री व मा.वित्तमंत्री यांच्या समवेत बैठक आयोजित करून या शाळांच्या याद्या घोषित कराव्यात असे शिक्षण विभागास मा.शिक्षक व मा.पदवीधर आमदार महोदय यांनी विचारलेल्या...

मंत्रालय स्तरावर टेबल टू टेबल पाठपुरावा. खैरे सर पुणे स्तर अघोषित शाळा अनुदान घोषित करीता आंदोलनाच्या तयारीत.

 लेखाशिर्ष३३६१ व ३३७९ , ५११च्या निधीचा शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी  मंत्रालय स्तरावर  टेबल टू टेबल पाठपुरावा      मुंबई/अमरावती. १७ जानेवारी २०२२: हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी मध्ये सदर लेखाशिर्ष करिता निधी जाहीर करण्यात आला होता परंतु आजपर्यंत निधी वितरीत न झाल्यामुळे मा. आमदार किरणराव सरनाईक त्यांचे पदाधिकारी यांना मुंबई येथे पाठविले त्यांनी मंत्रालय मुंबई येथे टेबल टू टेबल फाईल समोर सरकवली आहे. मा. उपसचिव श्री माळी साहेब यांच्याकडून आज फाईल क्लियर करुन  सहसचिव श्री व .कृ पाटील साहेबांकडे सादर झाली आहे. सदर फाईल आज त्यांच्याकडून क्लिअर होणार आहे. येत्या २ ते ३दिवसात मा. सचिव साहेबांच्या आदेशाने शासन निर्णय निर्गमित होईल अशी आशा आहे अमरावती विभागीय शिक्षक संघ ------------------------------------------------------------------------------ पुणे: १७ जानेवारी २०२२:  खैरे सर पुणे संचालक स्तरावर आंदोलनाच्या तयारीत, अघोषित शाळा अनुदानसाठी लवकर घोषित करण्यासाठी होऊ शकते आंदोलन.      पुणे संचालक स्तरावर अघोषित शाळा माहिती मंत्रालयात त्व...

फळे आणि भाज्या हे चांगल्या झोपेकरीता उपाय का असू शकतात. Fruits & Vegetables Natural Remedy for Sleep.

  फळे आणि भाज्या हे चांगल्या झोपेकरीता उपाय का असू शकतात.      तज्ञ म्हणतात की रात्रीची विश्रांती घेण्यासाठी तुमचा आहार ( DIET ) महत्त्वाचा आहे.   एखादे पुस्तक वाचा , गरम आंघोळ करा , कदाचित मेंढ्या मोजा - झोपण्याचा प्रयत्न करण्याचे आपल्या सर्वांचे स्वतःचे मार्ग आहेत. तरीही अनेकदा हे प्रयत्न अयशस्वी ठरतात.  अभ्यासात असे आढळून आले आहे की यूकेमधील सुमारे एक तृतीयांश लोक निद्रानाशाने ग्रस्त आहेत , याचा अर्थ ते झोपी जाण्यासाठी किंवा झोपण्यासाठी संघर्ष करतात आणि सुमारे दोन दशलक्ष लोक झोपेच्या गोळ्यांवर अवलंबून असतात.  परंतु संशोधनाचा वाढता भाग सुचवितो की तुमची झोप सुधारण्याचा एक सोपा मार्ग असू शकतो - आणि तो म्हणजे तुम्ही जे खाता ते सुधारणे.  कॅफीन असलेले पेय आणि अन्न , उत्तेजक , झोपेत अडथळा आणू शकतात हे फार पूर्वीपासून ओळखले जात असले तरी , असे दिसते की फळे , भाज्या आणि अगदी ठराविक काही खाद्य गटांचा वापर केल्यास चांगली झोप लागू शकते.  नुकत्याच जर्नल अॅन्युअल रिव्ह्यू ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासाच्या पुनरावलोकनातून हा निष्कर...

उदासीन (Depression)? एक उपचार म्हणून व्यायामाचा विचार करा.

  उदासीन (Depression)? एक उपचार म्हणून व्यायामाचा विचार करा . शारीरिक हालचालींचा अवसादविरोधी प्रभाव असू शकतो.   मुख्य मुद्दे : व्यायाम किफायतशीर आहे , औषधांचे दुष्परिणाम टाळतो , शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारतो आणि भविष्यातील नैराश्यापासून संरक्षण करतो. नैराश्य लोकांना खालच्या दिशेने आणू शकते कारण नैराश्याची लक्षणे स्वतःला पोसतात. व्यायामामुळे योग्य दिशेने आरोग्य निर्माण होते तसेच सौम्य उदासीनता आयोग्य दिशेने आरोग्यास नेते. व्यायाम. नुसते शब्द ऐकून अनेकांच्या मनात भीती आणि अपराधीपणाची भावना येते. आणि आपल्या सर्वांना माहित आहे की प्रारंभ करण्यासाठी स्वतःला प्रेरित करणे आव्हानात्मक असू शकते.   नैराश्य , प्रेरणा किंवा प्रेरणेचा अभाव हे एक वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे. म्हणून , काहीही करणे हे एक आव्हान असू शकते , ज्यामुळे स्वतःला व्यायाम करण्यास प्रवृत्त करण्याचा विचार अशक्य आहे. परंतु काही लोकांसाठी औषधोपचार किंवा मानसोपचार तितकेच व्यायाम प्रभावी ठरू शकतात याचे वाढते पुरावे आहेत. डिपार्टमेंट ऑफ व्हेटरन्स अफेयर्स आणि डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सच्या नैराश्याच्या उपचारांस...

वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी तुम्ही व्यायाम का करू नये.

  वजन कमी करण्यासाठी तुम्ही व्यायाम का करू नये.  अवांछित पाउंड कमी करण्याच्या आशेने आपल्यापैकी बरेच जण आपले स्नीकर्स घालत आहेत आणि व्यायामाची पथ्ये सुरू (किंवा पुन्हा सुरू करत आहेत). निःसंशयपणे , अधिक सक्रिय होण्याचे लक्ष्य ठेवणे ही चांगली गोष्ट आहे. परंतु वजन कमी करणे हे मुख्य कारण असेल तर , तुमच्या नवीन वर्षाच्या संकल्पाचा चांगलाच परिणाम होऊ शकतो.   सुरुवातीच्यासाठी , व्यायाम-किमान आपल्यापैकी बहुतेक जण करतात असा व्यायाम-साधारणपणे वजन कमी करण्यासाठी कुचकामी असतो. उदाहरणार्थ , चालणे घ्या. एक 150- पाउंड व्यक्ती जो 30 मिनिटे वेगाने चालतो तो सरासरी 140 कॅलरीज जळतो. ते सोडाच्या एका कॅनच्या बरोबरीचे आहे—तुमच्या वेळ आणि मेहनतीच्या गुंतवणुकीवर नक्कीच चांगला परतावा नाही. फक्त सोडा वगळणे खूप सोपे आहे.  एकंदरीत अभ्यास दर्शवितो की मध्यम तीव्रतेचा एरोबिक व्यायाम जसे की दिवसातून 30 मिनिटे चालणे , आठवड्यातून पाच दिवस—चांगल्या आरोग्यासाठी शिफारस केलेली रक्कम—सामान्यत: वजन कमी करते.   जेव्हा आहारात मध्यम व्यायाम जोडला जातो तेव्हा त्याचे परिणाम तितकेच प्रभावहीन असतात....

विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य.

विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य.   शिक्षण हे मुलांच्या आयुष्यातील एक पायाभूत पाऊल आहे. पण आता शिक्षण काय झाले आहे ? क्वचितच काहीतरी तथापि रॉट-लर्निंग आणि उंदीर-शर्यत. आवश्यक जीवन कौशल्ये शिकवण्याऐवजी , ती तणावपूर्ण गरज बनली आहे. शिक्षण म्हणजे काय आणि ते काय असायला हवं यातील दरी सतत रुंदावत चालली आहे. समोर येणारी प्रतिमा प्रभावी आहे आणि त्यावर त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. रिपब्लिक ऑफ इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकलच्या विश्लेषणानुसार भारतातील 12-13% महाविद्यालयीन विद्यार्थी मानसिक , भावनिक आणि संप्रेषणात्मक समस्यांनी ग्रस्त आहेत. जगामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मानसिक विकार शोधले गेले आहे. तथापि , भारतीय परिस्थिती अधिक वाईट आहे. बहुतेक विद्यार्थ्यामध्ये हे त्रास समजत नाही किंवा उपचार घेत नाहीत. मनोरुग्ण अवस्थेभोवतीचा कलंक अजूनही अस्तित्वात आहे. रिपब्लिक ऑफ इंडियन जर्नल ऑफ मेडिकल स्पेशॅलिटीने 2019 मध्ये शोधून काढले की भारतातील पन्नास दशलक्ष तरुणांना मानसिक स्थितीच्या समस्या आहेत. अशा प्रकारे सामान्य दिसणार्‍या या समस्यांचा त्यांच्यावर जबरदस्त प्रभाव पडेल. विद्यार्थ्यांची मानसिक...

पाकिस्तानला इराणने दिला मोठा झटका. भारताला अफगाणिस्तानला मदत पोहोचवण्यासाठी इराणने दिला मदतीचा हात.

  पाकिस्तानला इराणने दिला मोठा झटका. भारताला अफगाणिस्तानला मदत पोहोचवण्यासाठी इराणने  दिला मदतीचा हात.  इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की , संभाषणात अमीर-अब्दोल्लाहियन यांनी काबूलमध्ये सर्वसमावेशक सरकार स्थापन करण्याचे आम्ही आवाहन केले आहे. 10 जानेवारी 2022: पाकिस्तानने भारतातून अफगाणिस्तानला अन्नधान्य देण्यासाठी आडकाठी, अडथळे आणण्याचा प्रयत्न चालू केला आहे , इराणने आता संकटात सापडलेल्या अफगाणिस्तानात गहू , औषधे आणि कोरोनाव्हायरस लसींच्या वाहतुकीसाठी भारताला मदत करण्याचे ठरवले आहे.  इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर-अब्दोल्लाहियान यांनी शनिवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे संभाषणात हे सांगितले , असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.  इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की , या संभाषणात अमीर अब्दुल्लाहियन यांनी काबूलमध्ये सर्वसमावेशक सरकार स्थापन करण्याचे देखील आवाहन केलेले आहे.   “ अमीर अब्दुल्लाहियन यांनी अफगाणिस्तानमध्ये , सर्वसमावेशक सरकार स्थापन असावे असे सांगितले. त्यांनी अफगाणिस्तानला भारताच्य...

वजन कमी करण्यात मदत करण्यासाठी 12 टिप्स. 12 Tips to lose weight.

  वजन कमी करण्यात मदत करण्यासाठी 12 टिप्स . 12 Tips to lose weight. 1. नाश्ता वगळू नका: नाश्ता वगळल्याने वजन कमी होण्यास मदत होणार नाही. तुम्‍ही आवश्‍यक पोषक घटक गमावू शकता आणि तुम्‍हाला भूक लागली असल्‍याने तुम्‍ही दिवसभर स्‍नॅकिंग करू शकता. 2. नियमित जेवण घ्या:   दिवसा नियमित वेळी खाल्ल्याने कॅलरी जलद बर्न होण्यास मदत होते. हे चरबी आणि साखर जास्त असलेल्या पदार्थांवर स्नॅक करण्याचा मोह देखील कमी करते. 3. भरपूर फळे आणि भाज्या खा:   फळे आणि भाज्यांमध्ये कॅलरी आणि चरबी कमी असते आणि फायबरचे प्रमाण जास्त असते - यशस्वी वजन कमी करण्यासाठी 3 आवश्यक घटक यामध्ये असतात. त्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात. 4. अधिक सक्रिय व्हा:   सक्रिय असणे हे वजन कमी करणेची गुरुकिल्ली आहे. तसेच अनेक आरोग्य फायदे प्रदान करण्यासोबतच , व्यायामामुळे आपण केवळ आहारातून गमावू शकत नसलेल्या अतिरिक्त कॅलरी नष्ट करण्यात मदत करू शकतो. तुम्‍हाला आनंद वाटतो आणि तुमच्‍या दिनचर्येत बसण्‍यास सक्षम असा क्रियाकलाप ( Activity ) शोधा. 5. भरपूर पाणी प्या:   लोक कधीकधी भूक...