या वर्षी NEET झालेले बदल. या वर्षी NEET विद्यार्थ्यांनी NTA
NEET अधिकृत संकेतस्थळावरून NEET Admit Card
Download करून प्रिंट घेतली असेल. त्यावर दिलेल्या सर्व
सूचनांचे काटेकोरपणे सर्व परीक्षार्थींना पालन करावे. आपल्या NEET Admit
Card मध्ये जो वेळ आपल्याला दिला आहे त्यावेळामध्ये आपण आपल्या NEET
Exam Centres परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. परीक्षा
केंद्रावर पोहचल्यानंतर त्याठिकाणी एक नोंदणी खोली असणार आहे. त्याठिकाणी
परिक्षार्थींचे तापमान तपासले जाणार आहे, जर
परीक्षार्थींचे तापमान 37.4 ℃ /99.4 F कमी असेल त्या परीक्षार्थींना पुढे तपासणी करिता पाठवले जाणार. धातू-शोधक
यंत्रामार्फत सामाजिक अंतराचे नियम राखून तपासणी केली जाणार. यदाकदाचित काही
विद्यार्थ्यांचे तापमान तपासताना 37.4 ℃ / 99.4F पेक्षा जास्त असेल अश्या
विद्यार्थ्यांना एका खोलीमध्ये सामाजिक अंतराचे नियम राखून 15-20 मिनिट बसवले जाईल त्यादरम्यान तापमान कमी झाले तर पुढे तपासणी कडे पाठवले
जाणार. परंतु यंदा कदाचित तापमान कमी झाले नाही तर परीक्षार्थींनी घाबरून न जाता
अश्या परीक्षार्थींना परीक्षा देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे त्याठिकाणी
सर्व सामाजिक अंतराचे नियम पाळून विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार.
विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना NEET Admit Card, सरकारी ओळखपत्र (Admit Card मध्ये ओळखपत्र कोणते स्वीकारले जातील याची माहिती दिली आहे ती काळजीपूर्वक वाचा.), किंवा इतर आवश्यक कागदपत्रांची तपासणी पर्यवेक्षकांमार्फत केली जाईल. पर्यवेक्षकांकडून तपासणी झाल्यानंतर ते परीक्षार्थींना त्यांचा आसन क्रमाक्र पाहून पुढे परीक्षा खोलीकडे जाण्यासाठी मार्ग दाखवतील. नोंदणी खोली बाहेर असलेले पर्यवेक्षक नोंदणी खोलीमध्ये फक्त 10 परीक्षार्थी नोंदणी करित असतील याची दक्षता घेतील. 10 पैकी 5 परीक्षार्थीं नोंदणी पूर्ण झाल्यानंतर बाहेर गेल्यानंतर नवीन 5 परीक्षार्थीं नोंदणी खोलीत सोडतील. परिक्षाकेंद्रावर गेल्यावर आपला आत्मविश्वास डगमगु द्यायचा नाही. आपला NEET Exam करिता Physics, Chemistry, Biology या विषयांचा अभ्यास झाला आहे. आपण जे कष्ट घेतले त्यात आपल्याला यश मिळवण्याची NEET संधी आलेली आहे. त्यात आपल्याला यश संपादन करायचे आहे. यश हे आपलेच आहे.
Nice
ReplyDeleteNice content, I like your writing style Thanks for sharing such informative content. posting regularly, and keep sharing NEET Coaching in Delhi and Best Online Coaching For NEET Thanks.
ReplyDelete