तर दहावी-बारावीच्या परिक्षेवर बहिष्कार टाकणार. --शिक्षक समन्वय संघ,म.रा.
औरंगाबाद दि.०४ जाने २२
विना तथा अंशतःअनुदानित शाळांना पुढील टप्पा वाढीसह शासननिर्णय १५ नोव्हेंबर २०११ व ४ जून २०१४ मधील वेतन अनुदान वितरणाचे सुत्र लागू करणे,त्रुटीपात्र शाळंना पात्र घोषित करणे,अघोषित शाळा व नैसर्गिक वर्गतुकड्यांना अनुदानास पात्र करणे यांसह सर्वच मागण्या शासनदरबारी प्रलंबित आहेत.
वारंवार आंदोलन करूनही शासन दखल घेत नसल्याने शिक्षक समन्वय संघ,म.राज्यने यावेळी प्रलंबित मागण्यासाठी शासनाने दखल न घेतल्याने उपरोक्त संदर्भित मागण्यांसाठी शिक्षक समन्वय संघाने दहावी-बारावी परिक्षेवर बहिष्कार टाकण्याचे निवेदन आज औरंगाबाद विभागीय मा.सचिव यांना सादर केले आहे.
जालना जिल्हात या संदर्भात सर्व मुख्याध्यापक एकत्र येत बहिष्कारासाठी प्रथम पुढाकार घेतला असून इतर सर्व विभाग तथा जिल्ह्यातील मुख्याध्यापक तथा प्राचार्य यांनी संदर्भात भूमिका घ्यावी आणि आपल्या हक्काचा लढा बहिष्कार टाकून लढा भक्कम करावा.असे आवाहन या माध्यमातून करण्यात येत आहे.
येत्या अधिवेशनात सदरील मागणीचा साकल्याने विचार होत नसेल तर राज्यातील सर्वच शाळा,महाविद्यालयामध्ये (HOMECENTER) होऊ घातलेल्या परिक्षेवर बहिष्कार टाकणार असल्याचे असे शिक्षक समन्वय संघाने निवेदित केले आहे.
Comments
Post a Comment