MHTCET 2020 परीक्षा संभाव्य तारीख, अभ्यासाचे नियोजन. नुकतेच
कोर्टाकडून JEE Main 2020 परीक्षा 1 ते
6 सप्टेंबर 2020 व NEET UG 2020
परीक्षा 13 सप्टेंबर घेण्यासंदर्भात निर्णय
झाला त्यामुळे. आता या परीक्षा जर सुरळीत पार पडल्या तर MHTCET 2020 संदर्भात लवकरच निर्णय येऊ शकतो. काही दिवसांपूर्वी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री
महाराष्ट्र राज्य यांनी सांगितले होते की MHTCET Cell चे
आयुक्त यांच्यामार्फत जिल्हास्तरावर, तालुका स्तरावर परीक्षा
घेण्यासंदर्भात सर्व्हेक्षण सुरू आहे की ज्यामध्ये परीक्षा केंद्रावर बैठक
व्यवस्था, ऑनलाईन परिक्षेकरिता संगणक संख्या, लाईट, जनरेटर, इंटरनेट,
सोसिएल डिस्टन्स नियम पाळण्यासंदर्भात भौतिक सुविधा. तो अहवालात
प्राप्त होताच उच्च व तंत्र शिक्षकमंत्री यांना पाठवला जाईल त्यानंतर MHTCET
2020 Online Exam निर्णय घेण्यासाठी मदत होईल. MHTCET 2020
Online Exam संभाव्य तारीख 13 सप्टेंबर नंतर
असू शकते कारण 1 ते 6 सप्टेंबर JEE
Main 2020 होत आहे आणि 13 सप्टेंबर रोजी NEET
UG 2020 होत आहे. हे होत असताना शासनाकडून सद्याची परिस्थिती थोडी
निवळण्याची वाट जर पाहिली गेली तर ऑक्टोबर मध्ये संभाव्य तारीख येऊ शकते. या
परिस्थितीवरून आशा करू शकतो की येत्या काही दिवसांमध्ये MHTCET 2020 अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेची तारीख संदर्भात काही माहिती येऊ शकेल.
तूर्तास सद्य परिस्थिती MHTCET 2020 Online Exam विषयी तारीख
घोषित झालेली नाही. तरी विद्यार्थ्यांनी वेळेचा सद् उपयोग करून Physics,
Chemistry, Mathematics, Biology या विषयांचा नियोजनाप्रमाणे अभ्यास
सुरू ठेवावा.
NEET 2020 13 सप्टेंबर 2020 रोजी होत आहे. त्याचे प्रवेश पत्र NTA NEET 2020 अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. NEET 2020 Admit Card काळजीपूर्वक Download करून दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा. परीक्षा देत असताना सोबत काय बाळगू शकता त्याच सोबत सोबत काय बाळगू नये या संदर्भात सर्व सूचना दिल्या आहे त्याचे तंतोतंत पालन करा. NEET 2020 परीक्षा देताना सोबत मास्क , हॅन्डग्लोज , सॅनिटायझर 50 मिली पर्यंत सोबत बाळगू शकता. त्याच सोबत गरज असेल तर पारदर्शक पिण्याचे पाणी बाटली सोबत बाळगू शकता. NEET 2020 Admit Card सोबत आयकार्ड गरजेचे आहे. आयकार्ड कोणते त्याविषयी सविस्तर माहिती NEET 2020 Admit Card मध्ये दिलेली आहे. कोव्हिड 19 च्या परिस्थितीमुळे सामाजिक अंतर राखणे अत्यंत गरजेचे आहे त्याचे प्रत्येक विद्यार्थ्याने काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रावर नोंदणी केली जाणार आहे , त्याच सोबत शरीराचे तापमान देखील घेतले जाणार आहे. परीक्षा हॉल विद्यार्थ्यांनी प्रवेश करण्यापूर्वी आणि परीक्षा हॉल सोडल्यानंतर सॅनिटाइझ केला जाणार आहे. परीक्षा हॉलमध्ये जाताना सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टी...
Comments
Post a Comment