दिनांक 31 ऑक्टबर 2024: शालेय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर यांची अंशतः अनुदानित शिक्षकांनी भेट घेतली आणि माननीय शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांचा सत्कार केला. अंशतः अनुदानित शिक्षकांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार, महायुती सरकारने 20% अधिक 20 टक्के असे एकूण 40% म्हणजेच अनुदानाचे दोन टप्पे दिले. असे शिक्षकांचे पालकत्व स्वीकारणारे शालेय शिक्षणमंत्री झाले नाही, अशी भावना शिक्षकांकडून व्यक्त होत आहे. यावेळी शालेय शिक्षण मंत्र्यांनी देखील शिक्षकांकरिता या पुढील काळातही काम करीत राहील अशी ग्वाही दिली. सिंधुदुर्ग जिल्हा अंशतः अनुदानित शिक्षक कृती समिती तर्फे शालेय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर यांच्या सावंतवाडी येथील जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी सदर कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये श्री प्रमोद विश्राम आवरेकर श्री अद्वैत देवानंद गोरे, श्री सागर उल्लम करडे, श्री सुभाष सोनू खरात, श्री साईप्रसाद भरतकुमार वेनुरलेकर वेनुर्लेकर, श्री योगेश चव्हाण, श्रीमती प्रज्ञा ढेरे, श्रीमती विजया सावंत, श्री जोसेफ डीसिल्वा, श्री राहुल जाधव हे शिक्षक उपस्थित होते.
NEET 2020 13 सप्टेंबर 2020 रोजी होत आहे. त्याचे प्रवेश पत्र NTA NEET 2020 अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. NEET 2020 Admit Card काळजीपूर्वक Download करून दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा. परीक्षा देत असताना सोबत काय बाळगू शकता त्याच सोबत सोबत काय बाळगू नये या संदर्भात सर्व सूचना दिल्या आहे त्याचे तंतोतंत पालन करा. NEET 2020 परीक्षा देताना सोबत मास्क , हॅन्डग्लोज , सॅनिटायझर 50 मिली पर्यंत सोबत बाळगू शकता. त्याच सोबत गरज असेल तर पारदर्शक पिण्याचे पाणी बाटली सोबत बाळगू शकता. NEET 2020 Admit Card सोबत आयकार्ड गरजेचे आहे. आयकार्ड कोणते त्याविषयी सविस्तर माहिती NEET 2020 Admit Card मध्ये दिलेली आहे. कोव्हिड 19 च्या परिस्थितीमुळे सामाजिक अंतर राखणे अत्यंत गरजेचे आहे त्याचे प्रत्येक विद्यार्थ्याने काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रावर नोंदणी केली जाणार आहे , त्याच सोबत शरीराचे तापमान देखील घेतले जाणार आहे. परीक्षा हॉल विद्यार्थ्यांनी प्रवेश करण्यापूर्वी आणि परीक्षा हॉल सोडल्यानंतर सॅनिटाइझ केला जाणार आहे. परीक्षा हॉलमध्ये जाताना सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टी...
Comments
Post a Comment