प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक अनुदानाच्या प्रतिक्षेत असताना, मागील काही मंत्रिमंडळ बैठकीत वेतन अनुदान नस्ती शिक्षण मंत्र्यांनी
मंत्रीमंडळ बैठकीत मांडली तेंव्हा शिक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या की आपल्याला
अनुदान मिळेल परंतु मंत्रिमंडळ बैठकीत मत मतांतरे अनुकूल, प्रतिकूल
शिक्षकांच्या वेतन अनुदानासाठी प्रतिकूल ठरले का? कारण त्या
मंत्रिमंडळ बैठकीत उपसमिती गठीत करण्याचे सांगण्यात आले.
या आधी 20 वर्षा पासून विनावेतन
काम करणारे शिक्षक मेटाकुटीला आले, अनेकांना आपले जीवन
संपवले, अनेकांना ताण तणावामुळे विविध व्याधी जडल्या. परंतु
काही निष्ठुर मंत्री शिक्षकांना लवकर अनुदान मिळू नये या करिता आडवणूक करत आहे का?
असा प्रश्न सर्व सामान्य शिक्षकांना पडला आहे?
उपसमितीचे अध्यक्ष घोषित केले, मात्र अजून इतर सदस्य कोण? लेखी मात्र अजून काही
नाही? आठ दिवसांत निर्णय केला जाईल असे सांगितले, उद्या-परवा आठ दिवस पूर्ण होतील मात्र अजून समितीच गठीतचे लेखी काही नाही.
शिक्षकांचे लक्ष अनुदानाकडे लागले, शिक्षक शिक्षक आमदार महोदयांना वेतन अनुदान पाठ पुरावा संदर्भात फोन,
टेक्स्ट मेसेज करून विचारतात त्यामुळे शिक्षकांची काळजी म्हणून,
शिक्षकांना पोस्टर प्रसिध्द करून माहिती देण्याचा प्रयत्न झाला
त्यात माहिती दिली आहे शाळा अनुदानासाठी उपसमितीचे गठन, लवकरच
सकारात्मक अहवाल देतो. अहवाल सादर झाल्याबरोबर शाळा अनुदानाचे काम करणार.
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय करणारच व अनुदानाचा प्रश्न मार्गी लावणार.-ना.दादा. हे
सर्व शिक्षकांना माहिती म्हणून काही शिक्षक आमदार महोदयांनी सांगितले.
हे होत असतानाच काही शिक्षक संघटना लवकर निर्णय न
झाल्यास आंदोलनाच्या तयारीत आहे, काही शिक्षक संघटनांनी 14 सप्टेंबर पासून CST मुंबई पासून पायी दिंडी विषयी
माहिती शिक्षकांकरिता प्रसिद्ध केली आहे.
Comments
Post a Comment