नुकताच जगामध्ये एक महाभयंकर रोग आला, महाभयंकर
म्हटल्यावर सर्वांच्या डोळ्यासमोर चित्र उभे राहिले असेल ते या कोरोना रोगाचे.
हा कोरोना रोग कसा उत्पन्न झाला याविषयी खूप माहिती इंटरनेटवर
उपलब्ध आहे. त्याचा प्रसार कसा सुरू झाला, फैलाव कसा झाला. आपल्या पर्यंत
येणार नाही असे सर्वांनाच वाटत होते. आणि कधी आपल्या शहरात, गावात,
खेड्यात, वस्तीत, आला
याचा कोणी अंदाज देखील बांधला नसेल.
रुग्णसंख्या सुरुवातीला खूप कमी होती, ती आता एका
आठवड्यात थांबेल, एका महिन्यात थांबेल, काही महिन्यात थांबेल असे गृहीतके आपले आपणच मांडले परंतु सर्व चुकीचे
निघाले.
अजूनही कोरोनावर कधी औषध तयार होईल? त्याला
किती दिवस लागतील? हे प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरीतच आहे.
परंतु हे होत असताना कोरोनाने चांगल्या आणि वाईट दोनही परिणाम मानवी जीवनावर झाले
हे मात्र तेवढेच खरे. त्यातील काही मुद्यांवर आज आपण विचार मंथन करणार आहोत.
कोरोनाचे जे सुरुवातीचे रुग्ण होते त्यांच्या जवळ जाण्यासाठी
डॉक्टर, नर्स देखील घाबरत परंतु कर्तव्य मोठे यामुळे डॉक्टर, नर्स हे देवदूत त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना अविरत
सेवा देऊन बरे केले आणि हा बरा होण्याचा दर दिवसेंदिवस वाढत गेला त्याला अनेक
कारणही असतील परंतु त्यातील एक प्रमुख कारण डॉक्टर, नर्स
यांनी केलेली रुग्णसेवा, रुग्णांना रुग्णालयात दिलेला
आत्मविश्वास. की ज्या आत्मविश्वासाच्या जीवावर अनेक रुग्ण बरे झाले. परंतु हे होत
असताना नाण्याची दुसरी बाजू असते तसे काही बोटावर मोजता येतील असे रुग्णालयांनी
लोकांची लूट देखील केली याची सर्व माहिती विविध माध्यमांमध्ये प्रसिद्ध देखील झाली
आहे.
असे अनेक रुग्णालय, शहर, गाव,
खेडेगाव आहे की जिथे की जिथे अजूनही डॉक्टर किंवा साधे नर्स सुद्धा
नाही. आता सुद्धा मेडिकल फिल्डला खूप स्कोप आहे आणि यापेक्षा जास्त स्कोप भविष्यात
असणार आहे. कारण कोणीही स्वप्नात विचार केला नसेल की पूर्ण जग लोकडाऊन होईल. ही तर
फक्त सुरुवात आहे. काही दृष्ट प्रवृत्तीमुळे जगाला हा त्रास भोगावा लागला, आणि भविष्यात तो आणखी वेगळ्या पद्धतीने होऊ शकतो. त्यामुळे जर आपण मेडिकल
फील्ड जर निवडली तर आपल्याला करियर करिता भविष्यात खूप संधी असणार आहे परंतु
त्याकरिता आपल्या मनाची तयारी आहे का, हे काम करण्याची?
या प्रश्नाचे उत्तर शोधा आणि त्यानंतर या क्षेत्रातमध्ये उतरावे
नाहीतर फक्त पैसे मिळताय त्यामुळे करीयर निवडणार आणि भविष्यात काम करताना जर आवड
नसेल तर वेळ निघून गेलेली असते आणि पुन्हा दुसरे करियर निवडायचे असे नको व्हायला
या करिता हा लेख प्रसिद्ध करत आहे.
Comments
Post a Comment