Skip to main content

NEET MBBS, BDS, BHMS, BAMS प्रवेश प्रक्रियेत काही खोटे काम करू नका.

NEET 2020 ची अखेर परीक्षा झाली. काही विद्यार्थी आणि पालक यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून केलेल्या मेहनतीचा सुटकेचा निःश्वास सोडला असेल. परंतु आता खरी लढाई सुरू होत आहे. ती अत्यंत नियमाने, शिस्तबद्ध, प्रमाणिकपणे लढल्यास यश हमखास. परंतु त्यात जर काही खोटेपणा, शॉर्ट कट मारण्याचा प्रयत्न केला तर मात्र विजयची मुहूर्तमेढ रोवताना अडचणी निर्माण होऊ शकतील.

काही विद्यार्थी जे खरे आहे तेच सरकारी कागदपत्रे तयार करतात आणि ते खरे त्यालाभाचे मानकरी असतात त्यांना तो शासनाच्या नियमाप्रमाणे मिळतो.

परंतु समाजातील काही दृष्ट् प्रवृत्ती हा लाभ मिळवण्यासाठी मनामध्ये लोभ उत्पन्न करून चुकीचा मार्ग अवलंबता त्यांना फक्त साध्य साधायचे असते त्यामुळे त्या प्रव्रुत्ती विचार तत्त्व यांना तिळाजळी देत साध्य आर्थिक परिस्थितीच्या जोरावर साधता. आणि अत्यानंद साजरा करतात. परंतु हा आत्यानंद आताच्या अत्याधुनिक युगात फार काळ साजरा करता येत नाही, कारण आता बरेच क्षेत्रात डिजिटलायझेशन आले आहे. तिथे मात्र काळे कारनामे समोर येतात.

जुन्या काळात एक वाक्य बोलले जायचे "काही होत नाही" परंतु या वाक्याने या कलयुगात बऱ्याच लोकांना फसवले त्यापासून सेलेब्रिटी, राजकारणी, खेळाडू, इतर सर्व क्षेत्रातील काही बोटावर मोजण्याजोगती मान्यवर कंपनी वाचू शकली नाही. हे आपण आता दैनंदिन जीवन माध्यमांमध्ये बघतच आहोत.

असेच काही वर्षांपूर्वी MBBS, BDS प्रवेश प्रक्रियेत इतर राज्यातील विद्यार्थ्यांनी-पालकांनी डोमेसाईल म्हणजेच रहिवासी दाखले खोटे बनवून घेतले होते. आता त्यात कोण कोण सहभागी यात आपल्याला जायचे नाही परंतु 500 ते 1000 दरम्यान ही संख्या निघाली तेंव्हा त्यातील काही विद्यार्थ्यांना सत्याच्या, प्रामाणिकपणे, शिस्तबद्धपाने विचार करून वागले असते तर त्यांचा प्रवेश त्यांच्या मार्क्स नुसार 100% झाला असता पण या कलीयुगात लाभला ते बळी पडले, त्यांनी पण धाडस केले असेल "काही होत नाही." 

शेवटी त्यांना प्रवेश प्रक्रियेतून बाद करण्यात आले, त्यावेळेस त्यांनी केलेले अपार कष्ट एका चुकीमुळे शून्य झाले. पालकांच्या एका चुकीमुळे मुलांचे नुकसान झाले याला जबाबदार कोण? तर लोभ, माया यापासून नेहमीच दोन हात दूर राहिले तर असे प्रसंग जीवनात ओढवत नाही.

या प्रसंगातून आपणही काही बोध घ्यावा हीच या लेखमागील भावना, नाहीतर आहेच "काही होणार नाही."


Comments

Popular posts from this blog

NEET 2020 परीक्षा हॉलमध्ये जाताना.

NEET 2020 13 सप्टेंबर 2020 रोजी होत आहे. त्याचे प्रवेश पत्र NTA NEET 2020 अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. NEET 2020 Admit Card काळजीपूर्वक Download करून दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा. परीक्षा देत असताना सोबत काय बाळगू शकता त्याच सोबत सोबत काय बाळगू नये या संदर्भात सर्व सूचना दिल्या आहे त्याचे तंतोतंत पालन करा. NEET 2020 परीक्षा देताना सोबत मास्क , हॅन्डग्लोज , सॅनिटायझर 50 मिली पर्यंत सोबत बाळगू शकता. त्याच सोबत गरज असेल तर पारदर्शक पिण्याचे पाणी बाटली सोबत बाळगू शकता. NEET 2020 Admit Card सोबत आयकार्ड गरजेचे आहे. आयकार्ड कोणते त्याविषयी सविस्तर माहिती NEET 2020 Admit Card मध्ये दिलेली आहे. कोव्हिड 19 च्या परिस्थितीमुळे सामाजिक अंतर राखणे अत्यंत गरजेचे आहे त्याचे प्रत्येक विद्यार्थ्याने काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रावर नोंदणी केली जाणार आहे , त्याच सोबत शरीराचे तापमान देखील घेतले जाणार आहे. परीक्षा हॉल विद्यार्थ्यांनी प्रवेश करण्यापूर्वी आणि परीक्षा हॉल सोडल्यानंतर सॅनिटाइझ केला जाणार आहे. परीक्षा हॉलमध्ये जाताना सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टी...

या वर्षी NEET 2020 झालेले बदल.

या वर्षी  NEET  झालेले बदल. या वर्षी  NEET  विद्यार्थ्यांनी  NTA NEET  अधिकृत संकेतस्थळावरून  NEET Admit Card Download  करून प्रिंट घेतली असेल. त्यावर दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे सर्व परीक्षार्थींना पालन करावे. आपल्या  NEET  Admit Card  मध्ये जो वेळ आपल्याला दिला आहे त्यावेळामध्ये आपण आपल्या  NEET Exam Centres  परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. परीक्षा केंद्रावर पोहचल्यानंतर त्याठिकाणी एक नोंदणी खोली असणार आहे. त्याठिकाणी परिक्षार्थींचे तापमान तपासले जाणार आहे ,  जर परीक्षार्थींचे तापमान  37.4  ℃  /99.4 F  कमी असेल त्या परीक्षार्थींना पुढे तपासणी करिता पाठवले जाणार. धातू-शोधक यंत्रामार्फत सामाजिक अंतराचे नियम राखून तपासणी केली जाणार. यदाकदाचित काही विद्यार्थ्यांचे तापमान तपासताना  37.4  ℃  / 99.4F  पेक्षा जास्त असेल अश्या विद्यार्थ्यांना एका खोलीमध्ये सामाजिक अंतराचे नियम राखून  15-20  मिनिट बसवले जाईल त्यादरम्यान तापमान कमी झाले तर पुढे तपासणी कडे पाठवले जा...

MHTCET 2020 महाराष्ट्र शासन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई दिनांक 25. 10. 2019 जाहिर सूचना.

MHTCET 2020 महाराष्ट्र शासन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई दिनांक 25. 10. 2019 जाहिर सूचना. शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी तसेच औषध निर्माण शास्त्र तसेच कृषी पदवी म्हणजेच तसेच कृषी पदवी म्हणजेच इंजिनीअरिंग फार्मसी आणि एग्रीकल्चर या अभ्यासक्रमासाठी एमएचटी-सीईटी या अभ्यासक्रमासाठी (एमएचटी-सीईटी) MHTCET 2020 सामायिक प्रवेश परीक्षा गतवर्षीप्रमाणे 2020 मध्ये ऑनलाईन पद्धतीने पीसीएम व पीसीबी म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्री मॅथेमॅटिक्स व फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असा दोन गटांमध्ये एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे एकापेक्षा अधिक सत्र याचा अर्थ असा सकाळ सत्र दुपार सत्र म्हणजेच मॉर्निंग सेशन आणि आफ्टरनून सेशन परीक्षेचा कालावधी साधारणपणे 16 ते 20 दिवसांचा असून सदर परीक्षा मे 2020 महीन्याच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या आठवड्यात घेण्याचे प्रस्तावित आहे सदर परीक्षेचा कालावधी हा इतर परीक्षा व विद्यापीठांच्या परीक्षेचा कालावधी लक्षात घेऊन ठरविण्याचे विचाराधीन आहे. या परीक्षेचा निकाल तज्ञ समितीने केलेल्या नोरमलाईझेशन फॉर्मुला नुसार लावण्यात येईल ...