गेले कित्येक दिवसांपासून विद्यार्थी-पालक
कॉरोनाच्या या विचित्र परिस्थितीमुळे MHTCET होणार की
नाही या विषयी संभ्रम अवस्थेत होते. त्यात विद्यार्थी-पालकांच्या या संभ्रम
अवस्थेचा गैरफायदा काही खाजगी अभियांत्रिकी, किंवा इतर
महाविद्यालयांनी घेण्याचा खाजगी प्रवेश परीक्षा शुल्कामार्फत घेण्याचा प्रयत्न
केला. परंतु जे सुज्ञ पालक होते ते मात्र याला बळी पडले नाही. कारण शासनाकडून
सुद्धा MHT CET परीक्षा वेळापत्रक दिनांक विषयी अधिकृत
संकेतस्थळावर कळवले जाईल असे घोषित करण्यात आले होते.
आता MHTCET चे अधिकृत वेळापत्रक
अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात Physic, Chemistry,
Biology म्हणजेच PCB ग्रुप च्या परीक्षेच्या
तारखा आणि Physics, Chemistry, Mathematics म्हणजेच PCM
ग्रुप च्या तारखा प्रसिद्ध करण्यात आल्या आहे.
ज्या विद्यार्थ्यांना दोन ग्रुप म्हजेणजे PCB व PCM ग्रुप निवडले असतील त्यांना त्या त्या दिवशी MHTCET Admit Card वर दिलेल्या दिवशी दिलेल्या वेळेत
दिलेले पेपर द्यावे लागतील तसेच ज्यांनी फक्त एकच ग्रुप म्हणजेच PCB किंवा PCM या पैकी एकच ग्रुप निवडला असेल त्यांना
देखील MHTCET Admit Card वर दिलेल्या दिनांकास दिलेल्या
वेळेत पेपर द्यावा लागेल.
MHTCET
Admit Card अधिकृत संकेतस्थळावरुन डाउनलोड करून त्यात दिलेल्या सर्व
सूचना काळजी पूर्वक वाचा व त्याची तंतोतंत पालन करा.
सर्व MHT CET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप खूप
शुभेच्छा.
Thank you so much sir 🙏 for giving us information 👍.
ReplyDelete