JEE Main Cutoff NTA JEE Main च्या अधिकृत
संकेतस्थळावर घोषित झाला आणि त्यानंतर प्रश्न उभा राहिला की आता पुढे काय?
JEE Main पेपर 1 ज्या विद्यार्थ्यांनी दिला
त्या स्कोर आधारावर हा कट ऑफ आहे. यामध्ये प्रत्येक
विद्यार्थ्यांनी आपला संवर्ग (Category) मध्ये आपला कट ऑफ
पाहून घ्यायचा. दिलेल्या स्कोर एवढे किंवा त्यापेक्षा जास्त स्कोर असेल तर आपण
पात्र आहे असे समजावे. तसेच jee main अधिकृत संकेतस्थळावर
जाऊन निकाल डाउनलोड केल्यानंतर तिथे सुद्धा आपण तपासून पाहू शकता.
जे विद्यार्थी jee main cut off मध्ये
बसतात म्हणजेच पात्र झाले आहे. त्या विद्यार्थ्यांनी jee advance चे फॉर्म भरावे व jee advance परीक्षा द्यावी. त्यात
जर पुन्हा आपण jee advance cutoff मध्ये बसला तर आपली निवड iit
मध्ये उच्चशिक्षण घेण्यासाठी होणार.
जे विद्यार्थी jee main cutoff मध्ये पात्र झाले
त्यांना दुसरी संधी nit मध्ये प्रवेश घेण्याची उपलब्ध होते.
जर आपण jee main cutoff मध्ये पात्र असाल तर nit म्हणजेच National Institute Of Technolgy (NIT) चे
फॉर्म भरून त्याचे राऊंड करून प्रवेश मिळवू शकता. तसेच IIIT (Indian
Institute Of Information Technology) चे फॉर्म भरून त्याचे राउंड
करून त्यामध्ये सुद्धा प्रवेश मिळवू शकता.
जे विद्यार्थी JEE Main CutOff मध्ये पात्र झाले
त्यांना तिसरी संधी महाराष्ट्र राज्य सरकारचे जे अभियांत्रिकी (Engineering
College) मध्ये 15% जागांवरती प्रवेश मिळवू
शकता.
जे विद्यार्थी JEE Main Cutoff मध्ये पात्र झाले त्यासर्वांना Jee Advance परिक्षे करीता खूप खूप शुभेच्छा.
Comments
Post a Comment