NEET ला अखेर
मुहूर्त लाभला आणि परीक्षा पार पडली. पण त्यांनतर मात्र विद्यार्थी-पालकांनी पुढील
नियोजन योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. त्यातील काही मुद्यावर आज आपण विचार मंथन
करणार आहोत.
NEET परीक्षा दिल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांना पेपर सोपा, मध्यम, अवघड यापैकी एक स्वरूपात गेला असेल. आता NEET
2020 Answer Key तपासून स्वतःचे मूल्यमापन करून पाहा. किती
मार्क्स मिळताय ते पाहा. आलेली मार्क्स हे सरासरी मार्क्स आहे असे धरून पुढे
नियोजन करा. कारण ते मार्क्स थोडे कमी किंवा जास्त होऊ शकतात. परंतू पुढील
नियोजयाकरिता त्याचा उपयोग होऊ शकतो.
आपल्या मार्क्स
नुसार आपल्याला MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, Bsc Nursing, BASLP, व इतर आणखी कोणता कोर्स करिता प्रवेश मिळू शकतो त्याकरिता मागील वर्षाचे MBBS
Cutoff, BDS Cutoff, BAMS Cutoff, BHMS Cutoff, व इतर Private
College Cutoff, Government College Cutoff इंटरनेट वरून
मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्या.
आपल्याला
कोणत्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा त्याचा Cutoff आपल्या
संवर्गानुसार (Category) पहा. आपल्याला कोणत्या कॉलेजला
प्रवेश मिळू शकतो याची खात्री करून घ्या. त्याची एक यादी तयार करा. त्यात तुम्हाला
मिळणाऱ्या कोर्सचे नाव, कॉलेजचे नाव, कॉलेज कोड, फी लिहून ठेवा त्यामुळे तुम्हाला
प्रवेश प्रक्रियेत कॉलेजचे नाव देताना खूप त्रास होणार नाही.
सर्वात शेवटी
आणि महत्वाचे प्रत्येक कॉलेजची फीची माहिती घ्या, MBBS College Fees, BDS
College Fees, BAMS College Fees, BDS College Fees, त्यात पण Private
college fees, Government College Fees, अधिकृत वेबसाईटवरुन
घ्या किंवा प्रत्यक्ष कॉलेजला फोन करून विचारून घ्या. प्रत्येक कॉलेजची वेबसाईट
असते त्यावर फोन नंबर, कोर्स, प्रवेशाची माहिती असते ती काळजीपूर्वक पहा, गरज
असेल तर संपर्क करा. शिष्यवृत्ती मिळते का? किती मिळते? होस्टेल खर्च किती? मेस खर्च किती? इतर शैक्षणिक खर्च किती? आपली घरची आर्थिक
परिस्थिती यासर्व बाबींचा विचार करून पुढील नियोजन योग्य पध्दतीने करा.
Comments
Post a Comment