Skip to main content

इ.10 वी, इ.12 वी बोर्ड परीक्षा होणार का?

इयत्ता दहावी व इयत्ता बारावी मध्ये शिकत असलेले जे काही विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू आहे, परंतु नकळत मनामध्ये असलेली प्रश्न या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येतात की दहावी किंवा बारावीची बोर्ड परीक्षा होणार का? तर याविषयी आपण थोडक्यात चर्चा बघणार आहोत. संभाव्य शक्यता आहे, काय होऊ शकतं परीक्षा होणार कि नाही होणार? जर होणार नसेल तर कोणते मोठे मुद्दे की त्यामुळे ही परीक्षा होऊ शकत नाही या सर्व शक्यता आहे. यांची थोडक्यात माहिती बघणार आहोत. विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास कोणतीही काळजी, विचार न करता चालू ठेवायचा आहे. बोर्डाची परीक्षा दरवर्षी होतच असते परंतु कोरोनामुळे गेल्या काही वर्षापासून यामध्ये शक्यता निर्माण झालेल्या आहे. या शक्यतांची आपण फक्त या ठिकाणी संभाव्य शक्यता पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनी आपला इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी बोर्डाचा अभ्यास अत्यंत नेटाने करायचा आहे परीक्षा होणारच आहे याच मानसिकतेतून अभ्यास करायचा आहे आणि अत्यंत चांगले मार्क दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत मिळवायचे आहे जेणेकरून इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी मध्ये चांगल्या शाखेला आणि चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो आणि बारावीचे विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणाकरिता चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो. यातून करिअरची दिशा निश्चित होण्याकरिता मदत होणार आहे. या संभाव्य शक्यता पालकांमधून-विद्यार्थ्यांमधून चर्चिले जात आहे.

                                                                        इयत्ता दहावी इयत्ता बारावी बोर्डाची परीक्षा होऊ शकते याचे प्रमुख कारण काही विद्यार्थ्यांना आणि पालकांना जे वाटत आहे त्यात पहिले महत्त्वाचं कारण आहे, लसीकरण व इतर. या मुद्द्यावर आपण सुरुवातीला चर्चा करणार आहोत हे विद्यार्थी आणि पालकांचे मत आहे. लसीकरण जे आहे ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आता आपल्याला झालेलं पाहायला मिळते कारण गेल्या वर्षीची तुलना आपण केली तर त्यावेळेस लसीकरण झालेले नव्हते आणि कॉरोनाविषयी माहिती सुद्धा खूप कमी होती, त्यामुळे कुठलाही धोका नको त्यामुळे दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा होऊ झाल्या नाही आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या अंतर्गत परीक्षांच्या गुणांच्या आधारे निकाल देण्यात आले होते. या वर्षी लसीकरण जास्त प्रमाणामध्ये झालेले आहे आणि त्यामुळे यावर्षी रुग्ण जास्त नाही, अशी शक्यता आहे विद्यार्थी-पालक वर्गामध्ये चर्चिली जात आहे.

                                                                        दुसरा महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थी-पालकांमध्ये चर्चिला जात आहे प्रादुर्भाव वाढला किंवा नवीन जर व्ह्यारीयंट आला तर भविष्यामध्ये काही त्याचा प्रसार जास्त प्रमाणात व्हायला लागला आणि त्यामुळे रुग्णांची संख्या वाढली तर भविष्यामध्ये पुन्हा लाट येऊ शकते. यासाठी इतर देशांमध्ये सध्या चित्र आपल्याला पहायला मिळते. वेगवेगळ्या देशांमध्ये लसीकरण पूर्ण झाल्याचे चित्र होतं मात्र तरीदेखील काही देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलेलं होतं त्यामुळे आपले लसीकरण जवळपास पूर्ण झालेला आहे, जवळपास लसीकरण शेवटच्या टप्प्यात आहे तर येत्या काळामध्ये सुद्धा जर प्रादुर्भाव वाढला तर लॉकडाऊन ची शक्यता नाकारता येत नाही, पण लॉकडाऊन लागू नये ही सर्वांचीच इच्छा आहे परंतु तरी देखील ही शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे भविष्यामध्ये जर अशी परिस्थिती उद्भवली तर परीक्षा पुढे ढकलल्या जाऊ शकतात. कुणालाही वाटत नव्हते दोन वर्षापूर्वी covid-19 येईल आणि विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा होणार नाही आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या अंतर्गत मार्कवरून इयत्ता दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल मिळेल. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती याचे देखील प्रमाण खूपच अल्प आहे जर काही आपत्ती आली आणि त्यामुळे जर पुन्हा विद्यार्थ्यांनी ज्या चाचणी परीक्षा दिलेल्या असतील त्यावरून मूल्यमापन करून त्यांचा निकाल तयार करावा लागू शकतो पण या सर्व शक्यता खूप कमी आहेत त्यामुळे आता सर्वात महत्त्वाची मोठी शक्यता आहे की दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा ही जवळपास होणार आहे आणि त्या दृष्टीने शिक्षणमंत्र्यांकडून काही तारखा देखील सांगण्यात आलेल्या आहे. परंतु शिक्षण विभाग अशा पद्धतीने सुद्धा विचार करत असणार आहे कि जर पुन्हा काही आपत्ती आली तर परीक्षा कोणत्या पद्धतीने किंवा विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कोणत्या पद्धतीने करायचे आणि निकाल कसा तयार करयाचा? याची तयारी शिक्षण विभागाची असेल.

                                                त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता चांगला जोमाने अभ्यास सुरू ठेवला पाहिजेत आणि चांगले मार्क इयत्ता दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये मिळवले पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

NEET 2020 परीक्षा हॉलमध्ये जाताना.

NEET 2020 13 सप्टेंबर 2020 रोजी होत आहे. त्याचे प्रवेश पत्र NTA NEET 2020 अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. NEET 2020 Admit Card काळजीपूर्वक Download करून दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा. परीक्षा देत असताना सोबत काय बाळगू शकता त्याच सोबत सोबत काय बाळगू नये या संदर्भात सर्व सूचना दिल्या आहे त्याचे तंतोतंत पालन करा. NEET 2020 परीक्षा देताना सोबत मास्क , हॅन्डग्लोज , सॅनिटायझर 50 मिली पर्यंत सोबत बाळगू शकता. त्याच सोबत गरज असेल तर पारदर्शक पिण्याचे पाणी बाटली सोबत बाळगू शकता. NEET 2020 Admit Card सोबत आयकार्ड गरजेचे आहे. आयकार्ड कोणते त्याविषयी सविस्तर माहिती NEET 2020 Admit Card मध्ये दिलेली आहे. कोव्हिड 19 च्या परिस्थितीमुळे सामाजिक अंतर राखणे अत्यंत गरजेचे आहे त्याचे प्रत्येक विद्यार्थ्याने काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रावर नोंदणी केली जाणार आहे , त्याच सोबत शरीराचे तापमान देखील घेतले जाणार आहे. परीक्षा हॉल विद्यार्थ्यांनी प्रवेश करण्यापूर्वी आणि परीक्षा हॉल सोडल्यानंतर सॅनिटाइझ केला जाणार आहे. परीक्षा हॉलमध्ये जाताना सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टी...

या वर्षी NEET 2020 झालेले बदल.

या वर्षी  NEET  झालेले बदल. या वर्षी  NEET  विद्यार्थ्यांनी  NTA NEET  अधिकृत संकेतस्थळावरून  NEET Admit Card Download  करून प्रिंट घेतली असेल. त्यावर दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे सर्व परीक्षार्थींना पालन करावे. आपल्या  NEET  Admit Card  मध्ये जो वेळ आपल्याला दिला आहे त्यावेळामध्ये आपण आपल्या  NEET Exam Centres  परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. परीक्षा केंद्रावर पोहचल्यानंतर त्याठिकाणी एक नोंदणी खोली असणार आहे. त्याठिकाणी परिक्षार्थींचे तापमान तपासले जाणार आहे ,  जर परीक्षार्थींचे तापमान  37.4  ℃  /99.4 F  कमी असेल त्या परीक्षार्थींना पुढे तपासणी करिता पाठवले जाणार. धातू-शोधक यंत्रामार्फत सामाजिक अंतराचे नियम राखून तपासणी केली जाणार. यदाकदाचित काही विद्यार्थ्यांचे तापमान तपासताना  37.4  ℃  / 99.4F  पेक्षा जास्त असेल अश्या विद्यार्थ्यांना एका खोलीमध्ये सामाजिक अंतराचे नियम राखून  15-20  मिनिट बसवले जाईल त्यादरम्यान तापमान कमी झाले तर पुढे तपासणी कडे पाठवले जा...

MHTCET 2020 महाराष्ट्र शासन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई दिनांक 25. 10. 2019 जाहिर सूचना.

MHTCET 2020 महाराष्ट्र शासन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई दिनांक 25. 10. 2019 जाहिर सूचना. शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी तसेच औषध निर्माण शास्त्र तसेच कृषी पदवी म्हणजेच तसेच कृषी पदवी म्हणजेच इंजिनीअरिंग फार्मसी आणि एग्रीकल्चर या अभ्यासक्रमासाठी एमएचटी-सीईटी या अभ्यासक्रमासाठी (एमएचटी-सीईटी) MHTCET 2020 सामायिक प्रवेश परीक्षा गतवर्षीप्रमाणे 2020 मध्ये ऑनलाईन पद्धतीने पीसीएम व पीसीबी म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्री मॅथेमॅटिक्स व फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असा दोन गटांमध्ये एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे एकापेक्षा अधिक सत्र याचा अर्थ असा सकाळ सत्र दुपार सत्र म्हणजेच मॉर्निंग सेशन आणि आफ्टरनून सेशन परीक्षेचा कालावधी साधारणपणे 16 ते 20 दिवसांचा असून सदर परीक्षा मे 2020 महीन्याच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या आठवड्यात घेण्याचे प्रस्तावित आहे सदर परीक्षेचा कालावधी हा इतर परीक्षा व विद्यापीठांच्या परीक्षेचा कालावधी लक्षात घेऊन ठरविण्याचे विचाराधीन आहे. या परीक्षेचा निकाल तज्ञ समितीने केलेल्या नोरमलाईझेशन फॉर्मुला नुसार लावण्यात येईल ...