विनाअनुदानित तथा अंशतः अनुदानित शिक्षकांना सेवा-संरक्षणसाठी पुणे येथे धरणे आंदोलन.
पुणे: दिनांक: ३१ जानेवारी २०२२
महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समिती.
आपणां विनाअनुदानित तथा अंशतः अनुदानित शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांपैकी सर्वांच्या जिव्हाळ्याची व आजच्या घडीला त्यासाठी शासनाला कोणतीही जादाची आर्थिक तरतूद न करावी लागणारी मागणी म्हणजे 'सेवा-संरक्षण' होय.आपल्यात शासनाने हेतुपुरस्सर फूट पाडून इतके प्रश्न निर्माण केले आहेत की जो-तो आपापला प्रश्न सोडवण्यासाठी धडपडत आहे.परंतु दुर्दैवाने सेवा-संरक्षण कडे नाही म्हणायला सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे असे वाटते.
आणि म्हणूनच महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने सोमवार दिनांक ३१ जानेवारी २०२२ पासून आयुक्त कार्यालय,पुणे येथे या एकमेव मागणीकरीता 'बेमुदत धरणे आंदोलन' सुरू करण्यात येत आहे.
यास्तव राज्यातील तमाम विनाअनुदानित तथा अंशतः अनुदानित शिक्षकांना या पोस्टद्वारे आवाहन करण्यात येते की ज्यांना-ज्यांना शक्य आहे अश्यांनी उद्यापासून सुरू होणाऱ्या आंदोलनला कोरोनाविषयक सर्व नियम पाळून उपस्थित रहावे.
शाळेतील विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी आपण अपार मेहनत घेत असतो परंतु सद्यस्थितीत वाढत्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा व कुटुंबातील मर्यादित अपत्य संख्या यामुळे नैसर्गिक रित्या पट आपोआपच कमी होत आहेत.त्यामुळे १५ ते २० वर्षे बिनपगारी नोकरी केल्यावर आत्ता कुठे सुरू झालेला पगार(किंवा भविष्यात सुरू होणारा) पगार थांबून नोकरी गमावण्याची भीती आहे. आणि म्हणूनच आपल्या हक्कासाठी आंदोलन स्थळ गाठावे.
२८ फेब्रुवारी २०२२ पासून नागपुरात सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 'प्रचलित' साठी आंदोलनचे नियोजन सुरू असून त्याची रूपरेषा लवकरच कळविण्यात येईल..
आवाहनकर्ते. -श्री.खंडेराव जगदाळे(सर) आणि सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समिती.
Comments
Post a Comment