महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन महा. राज्य व नवयुग शिक्षक क्रांती शिक्षक संघटना म. रा यांच्या वतीने पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयात पाठपुरावा करण्यात आला.
महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन महा. राज्य व नवयुग शिक्षक क्रांती शिक्षक संघटना म. रा यांच्या वतीने पुणे शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे पाठपुरावा करण्यात आला.
- अघोषित प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक व सन २०१२/१३ च्या नैसर्गिक तुकड्याच्या शाळेच्या फाइल तात्काळ मंत्रालय स्तरावर पाठवणे.
- त्रुटी पूर्तता पात्र झालेल्या शाळेची यादी तात्काळ घोषित करून २० टक्के अनुदान मंजूर करणे.
- २० टक्के, ४० टक्के शाळांना पगारात होणारा विलंब तात्काळ दूर करून थकित वेतन शिक्षकाच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करण्याचा आदेश निर्गमित करावा.
- वरील मागण्या तात्काळ पुर्ण नाही झाल्या तर, आयुक्त कार्यालय पुणे येथे बेमुदत आंदोलन करण्यात येईल. असे संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
- शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांच्या कार्यालयात वरील मुद्द्यावर सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले. त्यावेळी राज्य अध्यक्ष श्री गजानन खैरे सर, मराठवाडा विभागीय अध्यक्ष श्री गोपाल गोरे सर तथा विविध संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक वृंद उपस्थित होते.
Comments
Post a Comment