पाकिस्तानला इराणने दिला मोठा झटका. भारताला अफगाणिस्तानला मदत पोहोचवण्यासाठी इराणने दिला मदतीचा हात.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, संभाषणात अमीर-अब्दोल्लाहियन यांनी काबूलमध्ये सर्वसमावेशक सरकार स्थापन
करण्याचे आम्ही आवाहन केले आहे.
10 जानेवारी 2022:
पाकिस्तानने भारतातून अफगाणिस्तानला अन्नधान्य देण्यासाठी आडकाठी,
अडथळे आणण्याचा प्रयत्न चालू केला आहे, इराणने आता संकटात
सापडलेल्या अफगाणिस्तानात गहू, औषधे आणि कोरोनाव्हायरस
लसींच्या वाहतुकीसाठी भारताला मदत करण्याचे ठरवले आहे.
इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन
अमीर-अब्दोल्लाहियान यांनी शनिवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत
दूरध्वनीद्वारे संभाषणात हे सांगितले, असे इराणच्या
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, या संभाषणात अमीर अब्दुल्लाहियन यांनी काबूलमध्ये सर्वसमावेशक सरकार
स्थापन करण्याचे देखील आवाहन केलेले आहे.
“अमीर अब्दुल्लाहियन
यांनी अफगाणिस्तानमध्ये, सर्वसमावेशक सरकार स्थापन असावे असे
सांगितले. त्यांनी अफगाणिस्तानला भारताच्या मानवतावादी मदतीचाही संदर्भ दिला,
इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणने ही मदत गहू, औषध
आणि कोविड-19 लसीच्या रूपात देशाला हस्तांतरित करण्यासाठी
उपाययोजना आणि सहकार्याची घोषणा केली,” असे एका निवेदनात
म्हटले आहे.
भारताने शुक्रवारी अफगाणिस्तानला दोन टन
अत्यावश्यक जीवनावश्यक औषधे वितरीत केल्याच्या एक दिवसानंतर, तालिबानने ताब्यात घेतल्यापासून देशाला मानवतावादी मदतीची हि तिसरी खेप
आहे.
ऑगस्टच्या मध्यानंतर काबूल तालिबानच्या ताब्यात
गेल्यानंतर, भारताने अलीकडेच जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच (WHO)
मार्फत अफगाणिस्तानला कोविड लसीचे जवळपास ५ लाख डोस आणि जवळपास १.६
टन वैद्यकीय मदत पुरवली होती.
भारताने अफगाणिस्तानला पुरवठा करण्याचे वचन
दिलेले 50,000 टन गहू अद्याप वितरित करणे बाकी आहे कारण पाकिस्तानमार्गे युद्धग्रस्त
देशाला मदत पोहोचवण्याची प्रक्रिया सुरु आहे त्यात पाकिस्तान वेगवेगळ्या पद्धतीने अडथळा,
आडकाठी निर्माण करत आहे.
भारतासमोर इराणमधील चाबहार बंदरातून
अफगाणिस्तानला मदत पाठवण्याचा मोठा पर्याय आहे.
ऊर्जा समृद्ध इराणच्या दक्षिणेकडील
किनारपट्टीवरील सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात स्थित, चाबहार
बंदर भारत आणि इराणद्वारे व्यापार संबंधांना चालना देण्यासाठी अत्यंत चांगल्या
पद्धतीने विकसित केले जात आहे, आणि त्याचा दूरगामी खूप फायदा होणार आहे.
“माझा इराणी सहकारी FM
@Amirabdolahian शी विस्तृत संभाषण झाले. कोविडच्या अडचणी, संकट, अफगाणिस्तानातील विवध आव्हाने, चाबहारची शक्यता आणि इराणच्या आण्विक समस्येची गुंतागुंत यावर सविस्तर चर्चा
झाली,” या संदर्भात जयशंकर यांनी शनिवारी ट्विट केले.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की
जयशंकर यांनी अफगाणिस्तानला आपल्या देशाच्या मदतीचा उल्लेख केला आणि त्या देशाबाबत
भारताचे धोरण समान राहिल.
15 ऑगस्ट रोजी
तालिबानने ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तानातील घडामोडींवर भारत इराणच्या सातत्याने
संपर्कात आहे.
इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दोन
महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानच्या संकटावर भारताने आयोजित केलेल्या प्रादेशिक
परिषदेत सहभागी झाले होते. या कॉन्क्लेव्हमध्ये रशिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान,
तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानच्या NSAs देखील
उपस्थित होते.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, अमीर-अब्दुल्लाहियान यांनी प्रमुख द्विपक्षीय, प्रादेशिक
आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर जयशंकर यांच्याशी विचार विनिमय केला.
"इराणमधील
कोरोनाव्हायरस विरूद्धच्या लढाईतील ताज्या परिस्थितीबद्दल भारतीय
परराष्ट्रमंत्र्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना, अमीर-अब्दोल्लाहियन
यांनी इस्लामिक रिपब्लिकमध्ये देशव्यापी लसीकरणाच्या चांगल्या ट्रेंडचा संदर्भ
दिला," असे त्यात म्हटले आहे.
इराणच्या
परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले कि आम्ही इराणमध्ये कोविड-19 योग्य पद्धतीने उपाय योजना करत आहोत. ते म्हणाले, “आम्ही
कोविड-19 योग्यपद्धतीने थांबण्यात सक्षम आहोत आणि आतापर्यंत
जवळपास 89-90 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आलेले आहेत
आणि त्यांना लसीचा तिसरा डोस सुद्धा दिला जात आहे."
इराणवरील निर्बंध उठवण्याबाबत व्हिएन्ना चर्चेवर, इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी यावर जोर दिला की चर्चा “योग्य दिशेने” जात
आहे.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने
अमीर-अब्दुल्लाहियान यांना उद्धृत करून सांगितले की, "सद्भावनेने
चांगल्या करारापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्याकडे आवश्यक इच्छाशक्ती आहे आणि जर
पाश्चात्य बाजूनेही ही सद्भावना आणि दृढनिश्चय असेल तर आम्ही एक चांगला करार करू
शकतो."
2015 मध्ये तेहरान
आणि EU सह अनेक जागतिक शक्तींमध्ये इराण आण्विक करार अंतिम
झाला होता. इराणच्या आण्विक अपेक्षांना थांबवणे हा उद्देश त्यांचा होता. अमेरिकेने
मे 2018 मध्ये या करारातून माघार घेतली होती आणि इराणवर
पुन्हा निर्बंध लादले होते. हा करार पुनर्संचयित करण्यासाठी आता नव्याने प्रयत्न
सुरू झाले आहेत.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की
जयशंकर यांनी साथीच्या रोगाविरूद्धच्या भारताच्या लढ्याचा देखील उल्लेख केला आणि मत
नोंदवले की रुग्णांची संख्या वाढत असली तरी लसीकरण चांगल्या गतीने सुरू आहे.
Comments
Post a Comment