आ.विक्रम काळे व आ.सुधीर तांबे यांच्यासोबत म.रा.का.वि.शा.कृती समिती शिक्षकांचा मंत्रालयात सेवासंरक्षण, वेतन निधी करीता पाठपुरावा.
आ.विक्रम काळे व आ.सुधीर तांबे यांच्यासोबत म.रा.का.वि.शा.कृती समिती शिक्षकांचा मंत्रालयात सेवासंरक्षण, वेतन निधी करीता पाठपुरावा.
मुंबई: १८ जानेवारी २०२२
3361 हेडच्या पगाराबाबत घेतली भेट शिक्षकांनी शिक्षणमंत्र्यांची भेट समवेत शिक्षकआमदार व पदवीधर आमदार...गुरुवार पर्यंत पगार न झाल्यास अंदोलनाचा दिला ईशारा....
आज कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती मुंबई विभाग शिक्षक व शिक्षकआमदार श्री. विक्रम काळे आणि पदवीधर आमदार श्री.सुधिर तांबे यांच्यासोबत शिक्षणमंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड यांची भेट घेण्यात आली. शिक्षकांकडून वेतन निधी शासन आदेश आजच निघावा अशी मागणी करण्यात आली. त्यावर शिक्षणमंत्री यांनी याबाबतीत लगेच सचिवांना फोनवरून सुचना केल्या व आंदोलन करण्याची आवश्यकता नाही असे सांगितले. तसेच सेवासंरक्षण हा विषय का लालफितीत आडकलाय याबाबतीत विचारणा करण्यात आली असता, फाईल तयार आहे. लवकरच सेवासंरक्षण शासन निर्णय घेऊ असे त्यांनी यावेळी सांगितले .सेवा सरंक्षणाचा निर्णय तात्काळ न झाल्यास दिनांक २५ जानेवारी २०२२ पासून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिक्षकांनी शिक्षणमंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड यांना दिला.
दरम्यान वेतन निधी शासन आदेश आजच निघावा म्हणून आ.विक्रम काळे व आ.सुधिर तांबे यांच्यासोबत कृती समितीच्या पदाधिकारी यांनी आज मंत्रालयात ठिय्या दिला. तसेच यासाठी टेबल टु टेबल पाठपुरावा देखील सुरु आहे. याच आठवड्यात पगार खात्यावर जमा होतील यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
यावेळी कृती समितीचे संजय डावरे, धनाजी साळुंखे, पुंडलीक रहाटे, गुलाब पाल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
श्री.अमितभाई प्रसाद
श्री.प्रविण पारसे सर
श्री.रविंद्र तम्मेवार सर
श्री.प्रमोद पाटील सर
महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती महाराष्ट्र.
Comments
Post a Comment