दुखवटा आंदोलन: महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आमदार महोदयांच्या घरासमोर त्रुटीपुर्तता याद्या तात्काळ घोषीत करुन आर्थीक तरतुद करावी यासाठी,सर्व संघटनेच्या बांधवांनी आवर्जुन हजर राहावे.....
दुखवटा आंदोलन: महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आमदार महोदयांच्या घरासमोर त्रुटीपुर्तता याद्या तात्काळ घोषीत करुन आर्थीक तरतुद करावी यासाठी,सर्व संघटनेच्या बांधवांनी आवर्जुन हजर राहावे.....
दि.२२/१/२०२२
उच्च माध्य./क म वि शिक्षक शिक्षकेत्तर संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित लढा न्याय व हक्कासाठी.
दि १२,१५, व २४फेब्रुवारी ला त्रुटीत आलेल्या बांधवाची एकाच महिण्यात त्रुटीपुर्तता करुन,आर्थीक तरतुद करावी असा,शासण आदेश असतांना विनाकारण आपल्याच सोबत घोषीत असलेले,तथा २०% वेतन घेत असलेल्या बांधवांवर कुठलीच कागदोपत्री चुक नसताना अन्याय केलेला आहे,दोन वेळा मा आमदार महोदयांच्या घरासमोर आंदोलने झाली,आझाद मैदानावर आंदोलन झाले,सभागृहात हा प्रश्न मा सभापती महोदयांनी राखुन ठेवला,शिक्षणखात्यावर नाच्चकी ओढवली तरी मा सभापती महोदयांनी सांगितल्या प्रमाने मा अर्थमंत्री महोदयांसोबतची बैठक होत नाही,व न्याय मिळत नाही,आपले त्रुटीचे बांधव मरत आहेत,त्यांचे ब्रेन हँब्रेज होत आहेत,तरी नुसती टोलवा टोलवी करुन वेळ मारुन नेऊन एक एक अधिवेशन शासन काम पुढे लोटत आहे,शिक्षणखात्याकडून तिन तिन वेळ फाईल पाठवल्यावर अर्थखात्याकडून नसते शेरे मारुन फाईल परत केली जाते,सर्व बाबीची पुर्तता केलेली असल्यावर का हा हेकेखोर पणा शासण करत आहे,हेच समजत नाही,आपले प्रतिनीधी ह्या गोष्टी करुन घेण्यात कमी पडत आहेत,असेच म्हणावे लागेल,व त्यांचेच हात मजबुत करण्यासाठी जो पर्यंत त्रुटीपुर्तता याद्या घोषीत होत नाहीत तोपर्यंंत आम्ही मा आमदार महोदयांच्या घरासमोरुन उठणार नाही,हा विषय मा आमदार महोदयांनी मा.मंत्रीमहोदयांना सांगावा व त्वरीत न्याय द्यावा,यासाठी हजारोच्यां सख्येने सर्व बांधवांनी उपस्थीत राहावे, कारण हा प्रश्न सुटल्याशिवाय शासण दुसर्या प्रश्नाला हात घालणार नाही असे दिसत आहे, म्हणुनच जाणुन हा प्रश्न पेंडीग ठेवला जात आहे, तेव्हा तात्काळ बैठक घेऊन त्रुटी पुर्तता केलेल्या शाळा काँलेजच्या याद्या घोषीतं कराव्या व आर्थीक तरतुद करुन न्याय द्यावा,त्या शिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही.
Comments
Post a Comment