..तर पुन्हा सुनावनीस उपस्थित असलेल्या मा.शिक्षक व मा.पदवीधर आमदार यांच्या निवासस्थानासमोर अथवा कार्यालयासमोर त्रुटीपात्र बांधव बेमूदत "दुखवटा"
..तर पुन्हा सुनावनीस उपस्थित असलेल्या मा.शिक्षक व मा.पदवीधर आमदार यांच्या निवासस्थानासमोर अथवा कार्यालयासमोर त्रुटीपात्र बांधव बेमूदत "दुखवटा"
औरंगाबाद दि.१७ जानेवारी
दुसरा आठवडा संपला,तिस-या आठवडा सुरू तरी बैठक नाही.२१ तारखेपर्यंत त्रुटीपात्र शाळांबाबत निर्णय न झाल्यास दि २२ जानेवारी २०२२ पासून बेमूदत "दुखवटा" पाळणार.
त्रुटीपात्र शाळांबाबत मा.सभापती यांनी या शाळांबाबत अधिवेशन संपल्यावर मा.मुख्यमंत्री व मा.अर्थमंत्री यांच्यासमवेत दुसऱ्या अथवा तिसऱ्या आठवड्यात बैठक घेऊन निर्णय घ्या,असे आदेशित केले होते.
विधानपरिषदेचे मा.सभापती महोदय यांनी हिवाळी अधिवेशनात(२८डिसेंबर२०२१)दिलेल्या निर्देशानुसार त्रुटीपात्र शाळांची यादी घोषित (शासननिर्णयाने) करण्यासाठी अधिवेशन संपल्यावर दुसऱ्या अथवा तिसऱ्या आठवड्यात मा.मुख्यमंत्री व मा.वित्तमंत्री यांच्या समवेत बैठक आयोजित करून या शाळांच्या याद्या घोषित कराव्यात असे शिक्षण विभागास मा.शिक्षक व मा.पदवीधर आमदार महोदय यांनी विचारलेल्या प्रश्नावर निर्देश करत असतांना वरील आदेश केले होते.
सदरील बैठकीसाठीचे मिनीटस् शालेय शिक्षण विभागास प्राप्त होऊन दुसरा आठवडा संपला आहे.सदरील बैठक ही मा.शिक्षक आमदार व मा.पदवीधर आमदार यांच्या पुढाकाराशिवाय लागणे शक्य नसल्याचे मंत्रालयीन कामकाजावरून दिसून येत आहे.कारण आतापर्यंत या बैठकीसाठीचे नोटिफिकेशन मा.मुख्यमंत्री व अर्थविभागास प्राप्त व्हावयास हवे होते परंतू दप्तरदिरंगाई होत असल्याचे आज निदर्शनास आले आहे.
शासन निर्णयामध्ये काही कागदपत्राअभावी शाळा त्रुटीमध्ये आलेल्या आहेत.अशा शाळा तथा वर्गतुकड्यांनी शासनादेशामध्ये नमुद केल्याप्रमी ३० दिवसाच्या आत या निश्चित कालावधीत प्रस्ताव दाखल करून आज नऊ ते दहा महिने झाले तरी पात्रतेचा शासननिर्णय निर्गमित झालेला नाही.विनाकारण त्रुट्या दाखवल्यामुळे शिक्षकांना नाहक विनावेतनाचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.त्यामुळे या शाळा,वर्गतुकड्यांचे भवितव्य अंधारात असल्याची भावना शिक्षकांमध्ये पसरली आहे.या भावना आणखी तीव्र होऊन त्यांचा बांध फुटू देऊ नये.सदर त्रुटीप्रस्तावावर तात्काळ निर्णय घेऊन शाळा व वर्गतुकड्यांना अनुदानास पात्र घोषित करणे आवश्यक आहे.त्याशिवाय त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना वेतन अनुदानाची पुरवणी डिसेंबर महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करून घेऊ असा शब्द सुनावनीस उपस्थितीत शिक्षक आमदार यांनी दिला होता.
परंतू अधिवेशनात ना पात्र यादी जाहीर झाली ना तरतूद झाली.तसेच दुसऱ्या किंवा तीस-या आठवड्यात बैठक घेऊन निर्णय घ्यावा असे मा.सभापती यांचे आदेश असून देखील बैठक झाली नाही.केवळ बैठकावर बैठका घेऊन त्रुटीपात्र शिक्षक बांधवांच्या प्रामाणिक भावनेशी खेळ खेळण्याचा प्रयत्न होतो आहे.त्यामुळे त्रुटीपात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आक्रमक झालेले आहे.
आपणास विनंती करण्यात येते कि,उपलब्ध असलेला कालावधी लक्षात घेता त्रुटीपूर्णतेचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढून या शाळा व वर्गतुकड्यांना २०% वेतन अनुदान व वाढीव २०% वेतन अनुदानास पात्र घोषित करण्याचा शासननिर्णय २१ जानेवारी २०२२ पर्यंत न निर्गमित केल्यास २२ जानेवारी २०२२ पासून पात्रतेच्या याद्या जाहीर होत नाही तोपर्यंत फक्त सुनावनीस उपस्थित शिक्षक व पदवीधर आमदार महोदयांच्या निवास अथवा कार्यालयासमोर दुखवटा सुरू राहणार असून या"दुखवट्यात" शासननिर्णय १२,१५ व २४ फेब्रुवारी २१ च्या शासननिर्णयातील त्रुटीपूर्तता केलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. शासनाच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत अशी नम्र विनंती.
आपले नम्र,
के.पी.पाटील
प्रा.सदानंद बानेरकर
प्रा.गजानन काकड
प्रा.महेंद्र बच्छाव
प्रा.विजय सोनवने
प्रा.आनंद चौधरी
प्रा.महेंद्र वाडेकर
सौ.रुख्मिणीताई गावडे
Comments
Post a Comment