अमरावती: दिनांक: १९ जानेवारी २०२२:
लेखशिर्ष ५११ निधी शासन निर्णय बाबत माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांनी लेखाशिर्ष ५११ मधील निधी अजूनही खर्च न केल्यामुळे मंत्रालय स्तरावरून अगोदर तो निधी खर्च करावा अशा सूचना देण्यात आल्या होत्या त्यामुळे आज तो शासन निर्णय निघू शकला नाही. परंतु अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरणराव सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना अवगत केले की बरेच जिल्ह्यांनी हा निधी खर्च केला असून नोव्हेंबर पासून कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित आहेत. त्यामुळे अशा जिल्ह्यांसाठी निधीची आवश्यकता असल्याने सदर लेखशिर्षका करिता निधी वितरण करावे असे सूचित केले असून लेखाशिर्ष ५११ निधी चा शासन निर्णय येत्या एक ते दोन दिवसांमध्ये निर्गमित करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
-अमरावती विभागीय शिक्षक संघ.
Comments
Post a Comment