शालार्थ,सेवा सातत्य संबधी शिबिर(अहमदनगर जिल्हा) संपन्न: मा.आ.किशोरभाऊ दराडे (शिक्षक आमदार,नाशिक विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अधिकारी यांच्या उपस्थितीत शिबिराचे आयोजन संपन्न.
अहमदनगर: १८ जानेवारी २०२२
उच्च माध्यमिक,कमवी शिक्षक शिक्षकेत्तर संघटना,महाराष्ट्र राज्य.
शालार्थ,सेवा सातत्य संबधी शिबिर(अहमदनगर जिल्हा)
मा.आ.किशोरभाऊ दराडे (शिक्षक आमदार,नाशिक विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अधिकारी यांच्या उपस्थितीत शिबिराचे आयोजन संपन्न.
ठिकाण-- आत्मा मलिक विद्यालाय कोकमठान, कोपरगाव.जि- अहमदनगर.
दिनांक-- १८ जानेवारी २०२२, वार- मंगळवार
वेळ- दुपारी २ वाजता.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक, कमवी शाळेतील 20% अनुदानित असणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींना सूचित करण्यात येत आहे की,ज्या ज्या बांधवांना शालार्थ,सेवा सातत्य बाबत अडचणी असतील,प्रस्ताव प्रलंबित असतील,प्रशासनिक तक्रारी असतील त्या त्या बांधवानी तात्काळ कोकमठान येथील शिबिरात सहभागी व्हायचे आहे. शालार्थ तसेच सेवा सातत्य बाबतीत वेळोवेळी येणाऱ्या तक्रारी, प्रलंबित असणारे प्रस्ताव, अधिकाऱ्यांच्या तक्रारी याबाबतीत स्पष्ट न्याय मिळावा म्हणून शिक्षक आमदार मा.किशोरभाऊ दराडे यांनी शिबिराचे आयोजन केले आहे. तर जास्तीत जास्त बांधवानी ह्या शिबिराचा लाभ घ्यावा.अन्यथा वैयक्तिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.....अहमदनगर जिल्ह्यातील बांधवानी मोठ्या संख्येने शिबिराला उपस्थिती द्यावी.
टीप-- काही तक्रारी असतील तर सोबत पुरावा म्हणून योग्य कागदपत्रे आणावी.
आपला स्नेही.
प्रा.कर्तारसिंग ठाकूर.
Comments
Post a Comment